मामुर्डी मध्ये विकासाचा डोंगर उभा करणार : शिवेंद्रराजे भोसले
सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी
जावली (मेढा) : छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतीहासीक मामुर्डी गावातील जनतेने मला साथ द्या गावात कोणताही विकास बाकी राहणार नाही विकासाचा डोंगर उभा करेन. मग तुमचं क्रिडा मैदान असो, छत्रपती शिवाजी महाराजांच स्मारक असो, सांकृतीक भवन असो मी विकास कामात कमी पडणार नाही कारण मी बोलत नाही माझं कामचं बोलत. परंतु इलेक्शन आले की कोणीतरी येत तुम्हाला काही तरी सांगतं कि तुम्ही भावनीक होता पण यावेळी भावनीक होवू नका, यापुढे विकास करायचा असेल तर गावातील गट तट संपवले पाहिजे असे आवाहन शिवेंद्रराजें भोसले यांनी केले. आमचे प्रतिनिधिशी बोलताना जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजने म्हणाले तालुक्यात प्रत्येक गणात स्पर्धा चाललेय कोणता गण बाबांना लीड जास्त देतोय, खरं तर विजय आपलाच आहे पण आमचे आंबेघर गणातून सर्वात जास्त लीड बाबाराजेंना मिळालं पाहिजे त्यासाठी मोठ्या फरकाचे मताधिक्य वाढण्यासाठी प्रत्येक गावात, बूथवर लक्ष ठेवून कार्यकते कामाला लागलेत. कार्यक्रमांस सातारा जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजने, सॊरभ बाबा शिंदे, एकनाथ दादा ओबळे, सागर धनावडे,जयदीप शिंदे, तुकाराम जुनघरे मा. सरपंच , नाना जांभळे,मुळीक सर,भास्कर धनावडे,राजेंद्र जाधव,राजेंद्र शेलार,कविता धनावडे, आनंदशेठ धनावडे, विजय भिलारे,ग्रामपंचायत सदस्य बाजीराव धनावडे, वसंत मोरे, व्हा. चेअरमन पांडुरंग धनावडे,सविता धनावडे,माजी सरपंच ज्ञानदेव धनावडे,पांडुरंग धनावडे,ज्ञानदेव भिलारे,भिकू धनावडे,रामचंद्र भिलारे,शांताराम भाऊ धनावडे , बापूसाहेब धनावडे , विनोद सावंत तसेच ग्रामस्थ उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत अजय धनावडे, प्रस्तावना जावळी सहकारी बँकेचे संचालक विश्वनाथ धनावडे तर आभार प्रशांत धनावडे यांनी मानले.


