आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमदी पोलिसांचा रूट मार्च, नागरिकांनो, जातीय,सामाजिक तेढ निर्माण केल्यास कारवाई करणार :- सहाय्यक पोलीस पोलीस संदीप कांबळे.
संभाजी पुरीगोसावी ( सांगली जिल्हा ) प्रतिनिधी.
राज्यांत सध्या विधानसभा निवडणुकीच्या नंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे तसेच या निवडणुका शांततेत पार पडाव्यात तसेच आगामी सण उत्सव साजरे होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सागली जिल्हा पोलीस प्रशासनही चांगलेच सतर्क झाले असून. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी सण, उत्सवांच्या काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच ग्रामीण भागात कुठेही अनुचित घटना घडू नये याकरिता शांतता व सुव्यवस्था कायम राहावी या उमदी पोलिसांचा नुकताच रूट मार्च काढला आहे. सदर रूट मार्च उमदी पोलीस ठाणे हद्दीतील बेळुंडगी,करजगी भिवर्गी,मोरबदी, माणिकनाळ,लवंगा,गिरगांव अशा गावांतून रूट मार्च करीत सन 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पोलिसांनी सूचना केल्या. सदर रूट मार्च हा जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांच्यासह दोन पोलीस अधिकारी उमदी पोलीस ठाणेकडील पोलिस अंमलदार तसेच सीआरपी जवानांसह आदींनी या रूट मार्चमध्ये सहभाग आपला नोंदवला.


