सावरदरे गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी राजेंद्र साळुंके तर उपाध्यक्षपदी तुळशीराम काळे यांची निवड.
कार्यकारी संपादक: सागर खुडे
ग्रामपंचायत सावरदरे महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी राजेंद्र बाबुराव साळुंके आणि उपाध्यक्षपदी अशोक तुळशीराम काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी विविध विकासकामांसह शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन जास्तीत जास्त लाभार्थींनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच गणेश साळुंके यांनी केले. सावरदरे ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली.
या सभेला ग्रामसेवक महादेव सोनवणे ग्रामपंचायत सरपंच गणेश ज्ञानोबा साळुंके तसेच उपसरपंच पोपट किसन पापळ सामाजिक कार्यकर्ते अंकुश बबन साळुंके , अशोक रघुनाथ साळुंके, अनिल सोपान साळुंके , जगन सखाराम साळुंके ,अक्षय नामदेव साळुंके ,योगेश ज्ञानदेव दरेकर, महादेव दादासो साळुंके, सत्यवान शंकर साळुंके आणि ग्रामस्थ उपस्थित होते.