पौड पोलीस ठाण्याला मिळाला खमक्या अधिकारी…? पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी स्वीकारला पदभार,
संभाजी पुरीगोसावी
पुणे ग्रामीण विभागातील पौड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांची रेल्वे महामार्ग पोलीस दलात बढती झाल्याने पौड पोलीस ठाण्याची खुर्ची रिकामीच होती, या पोलिस ठाण्याला सिंघम अधिकारी मिळावा अशी मुळशीकरांकडूंन अपेक्षा व्यक्त होत होती, अखेर पौड पोलीस ठाण्याला खमक्या अधिकारी मिळाला आहे, पौड मुळशीतल्या पोलीस पौड पोलीस स्टेशनच्या रिक्त पदावर पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांची नियुक्ती करण्यात आली असून गिरीगोसावींनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे, आता मुळशीच्या कायदा सुव्यवस्था राखण्याचे शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी गिरी गोसावी यांच्यावर आलेली आहे, यापूर्वी गिरीगोसावी हे जिल्हा वाहतूक शाखेत कार्यरत होते, तसेच गिरीगोसावी यांनी यापूर्वी सोलापूर ग्रामीण पुणे ग्रामीण पोलीस दलात देखील विविध पोलीस ठाण्यात उत्कृंष्ट सेवा दिली आहे, दबंग आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून गिरीगोसावी ओळखले जातात, गुन्हेगारी पार्श्वभूमीची धग मुळशी तालुक्यांवर असताना मुळशीत इतर गुन्हे देखील जोमात आहेत, चोरांच्या प्रकारांत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत, असून त्यावर अंकुश ठेवायला पोलीस यंत्रणा स्पेशल कुचकामी ठरली आहे, चोरांना पोलिसांची भीतीच उरली नसल्यांने बिनधास्त रात्री घरफोड्या होत आहेत त्यामुळे येथील नागरिकही धास्तावले आहेत अवैध धंदे नदीपात्रा शेजारी राजरोसपणे चालणाऱ्या हातभट्ट्या, बेशिस्त वाहतूक चालक चांदणी चौक ते पौड पर्यंत होणारा वाहतूक खोळंबा शाळे बाहेर तसेच गावातून दुचाकीवर गिरट्या घालत फिरणारे टवाळखोर मुळशीत वाढलेली परप्रांतीय नागरिकांची गुन्हेगारी यांचा बिमोड करण्याचे मोठे आव्हान आता नव्या पोलीस निरीक्षकांकडून आहे, तसेच होणाऱ्या चोऱ्या रोखण्याचे व झाल्याचे उक्कल करण्याचे शिवधनुष्य पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी पेलतील अशी अपेक्षा आता मुळशीकरांकडुन व्यक्त होत आहे.