तात्यां गेल्याने कुटुंबात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली ; कुटुंबाचा आधारवड गेला!संभाजी पुरीगोसावी
संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगांव तालुक्यांतील आणि करंजखोप गावचे ज्येष्ठ नागरिक आणि साताऱ्यातील करंजे पेठ या ठिकाणी वास्तव्य असणारे आणि आमचे चुलते कै. रामचंद्र बापूपुरी पुरीगोसावी उर्फ ( तात्या ) यांचे अचानक मागील पंधरा दिवसांपूर्वी हृदयविकारांच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले असून तात्यांच्या जाण्यांने अजूनही करंजखोप, साताऱ्यातील करंजे पेठेसह संपूर्ण पै. पाहुण्यांतून हळहळ व्यक्त होत आहे. तात्यांच्या पश्चांत पत्नी तीन मुलै सुना नातवंडे आणि भाऊ भावजय बहीण यांच्यासह आठ पुतणे मोठा परिवार आहे, तात्यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबात मोठी पोकळी निर्माण झाली, कुटुंबाचे ते आधारस्तंभ आणि प्रमुख म्हणून चांगलेच ओळखले जात होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज भला मोठा परिवार होता, तात्यांची आठवण ही कायमच समोर राहणार आहे, स्वप्नात देखील असे वाटले नव्हते की तात्या आम्हांला अचानक सोडून जातील, तात्यांच्या असणे आम्हांला खूप गरजेचे होते, त्यांच्यामुळे आज माझ्या परिवारातील सर्व सदस्यांना एक शिस्तप्रिय आणि मार्गदर्शन असं त्यांचं नेतृत्व होते, त्यांच्या दबावाखाली कुटुंबातील सर्व सदस्य होते, असं म्हणतात की कुटुंबात एक तरी प्रमुख असा असावा, त्याच्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा कायदा आणि सुव्यवस्था तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांना शिस्तप्रिय आणि नुसतं मार्गदर्शन जरी असले तरी, कुटुंब देखील चांगलेच सुरळीत चालते, तात्यांची क्षणोक्षणी आठवण माझ्या कुटुंबाला कायम राहणार आहे, सन 86 साली करंजखोप गाव सोडून ते साताऱ्यात वास्तव्यांस आले होते, अतिशय खडतर प्रवासातून आपल्या पत्नी आणि तीन मुलांसमवेत संसार संसार थाटला होता, मागीलच दोन वर्षांपूर्वी त्यांनी नवीन इमारत देखील उभी केली होती, तात्यांनी आपल्या प्रवासामध्ये अनेक माणसं कमावली जोडली, रिक्षा प्रवासी म्हणून देखील त्यांनी विना अपघात साताऱ्यात प्रवाशांची सेवा केली, रिक्षा धंदा पहात त्यांनी जागरण गोंधळ या कार्यक्रमांच्या माध्यमांतून त्यांचा जनसंपर्क देखील चांगलाच झाला होता, तात्याबद्दल बोलायचे झाले, तर शब्द कमीच पडतील, असं त्यांचं नेतृत्व होतं, कुटुंबामध्ये दिवाळीची आणि यात्रेची धामधूम नुकतीच सुरू होणार होती, तात्या देखील आपल्या कुटुंबासह यात्रेसाठी गावी येणार होते, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, तसेच नियतीच्या पुढे पण कोणाचे काही चालत नाही असे म्हणतात ते मात्र अखेर खरे झाले आणि आमचे तात्या देवांना आवडले असावेत असे म्हणण्यातही काही वावगे ठरणार नाही, तात्यांनी आम्हांला लवकरच पोरके करून ठेवले, आता फक्त तात्याची कायम आठवण आणि तात्यांचा जीवन प्रवास समोर राहील, तात्यांनी आपल्या जीवन प्रवासामध्ये कधीच कोणाशी वादीवाद निर्माण केला नाही, सर्वांनाच त्यांनी सांभाळून घेतले होते, सन 2005 माझ्या वडिलांचे निधन झाले होते, त्यावेळी मी इयत्ता 5 पाचवी मध्ये शिकत होतो, वडिलांच्या निधनानंतर माझ्यावर आणि आईवर त्यांचे कायमच लक्ष होते, कधीही त्यांनी मला चुलत्याचे नातं भासु दिलं नाही, नेहमीच तात्या माझ्या संपर्कात होते, कुटुंबात जास्त मला मानायचे, आमच्या संभा,ची ओळख पोलीस मामलेदार कलेक्टर पर्यंत आहे, त्याला काय असेल तर सांगा तो तुमचं नक्कीच काम करेल असे ते नेहमीच सर्वांना सांगायचे, तात्यांनी कधीच कुटुंबामध्ये मोठेपणा कधीच केला नाही, आपल्या पत्नीसह मुलांना सर्व पुतण्यांना भावांना बहिणींना भावजयांना देखील त्यांनी चांगलेच सांभाळून घेतलं होतं, आजही तात्यांची कुटुंबाला क्षणोक्षणी आठवण येत आहे, पण एकदा धागा तुटला तर तो जोडता येत नाही, असं म्हणतात असे आम्हांला अचानक तात्यांनी पोरके केलं, तात्या तुम्ही आजपर्यंत दिलेल्या शब्दांचा आधार आणि मार्गदर्शन कायम ठेवीन, आणि संपूर्ण कुटुंबाला देखील सांभाळून घेईल, फक्त तुमचा आशीर्वाद आता कुटुंबावर व माझ्या पाठीशी कायम राहू द्या, खरच तात्या तुम्ही परत यावे असे आम्हांला वाटत आहे, तुमच्या जाण्यांने अजूनही हळहळ व्यक्त होत आहे,


