आय.पी.एस.समीर शेख साहेब तुम्हाला सातारा जिल्हा कधीच विसरु शकणार नाही :- प्रकाश भैय्या गायकवाड
दिलीप वागमारे
सातारा :-एस.पी.समीर शेख साहेब हे नोव्हेंबर 2022 मध्ये गडचिरोली येथून सातार्यात रुजू झाले.अवघ्या पावणे दोन वर्षात अनेक कामगिरींची घोड-दौड त्यांनी सुरु केली. कायदा व सुव्यवस्था राखत पोलिस दलाच्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या आयडिया त्यांनी राबवल्या. यामध्ये प्रामुख्याने प्रतापगड येथील अफजलखान कबरीलगतच्या अतिक्रमणावर हातोडा त्यांनी मारला. पहिल्याच आठवड्यात असा षटकार मारल्यानंतर पुढेही त्यांनी घरफोड्या करणार्यांना जेरबंद करुन सर्वसामान्य नागरिकांचे सुमारे 4 किलो सोने त्यांनी मिळवून दिले. गुंडा-पुंडांचाही बंदोबस्त करत संघटीत गुन्हेगारी (मोका), तडीपारी, एमपीडीए याचा धडाका ठेवला. सातारा जिल्ह्यातील तरुण होतकरुन युवक भरकटू नये, म्हणून त्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी हजारो युवकांना-युवतींना उंच भरारी या प्रकल्पाद्वारे काम मिळवून दिले.मी महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेचे काम करत असताना पोलीस परिवारातील अडचणी एस.पी.समिर शेख साहेबांसमोर मांडल्यावर वेळ काढून त्यांनी ऐकून घेतल्या, व त्या अडिचणी प्रामाणिक पणे सोडवल्या साहेबांचा साताऱ्यातील कार्यकाळ आठवला तर ते जाणार या गोष्टीची कल्पनाच करण मुश्किल आहे, तरीही जड अंतःकरणाने तुम्हाला निरोप द्यावा लागतोय पण सर मी प्रकाश भैय्या गायकवाड महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेचे सातारा जिल्हा प्रमुख म्हणून या नात्याने सांगतोय की, सातारा जिल्हा आपले योगदान कदापि विसरणार नाही
शेवट एवढच बोलेन……… साताऱ्याचा सिंघम निघाला.
नेहमीच गाठावीत आपण यशाची उंच उंच शिखरे
मात्र विसरू नयेत कधीच आपल्याच कुटुंबातीले लेकरे
संयम म्हणजे काय हे आपणा कडूनच तर शिकलो मोठ्या मनाने माफ करा जर आम्ही कधी असेल चुकलो
इथून पुढचा प्रवास सुखाचा होवो आपला
आपल्या आदर्श कार्याचा ठसा आम्ही हृदयात खोलवर जपला
शिस्त आणि प्रामाणिकपणाचं आपण उदाहरण आहे एक जिवंत
आपण सोडून चाललात याची
आमच्या मनी आहे खंत.


