लोणंद मध्ये प्रभाग सहा मधील बंदिस्त गटाराचा नेते मिलिंद दादा पाटील यांच्या शुभहस्ते शुभारंभ संपन्न
संपादक: दिलीप वाघमारे
सातारा :- गुरुवार दि. २२ मे रोजी मौजे लोणंद, ता. खंडाळा, जिल्हा-सातारा येथील नगरसेविका सौ. राजश्री रविंद्र शेळके यांच्या प्रभाग ०६ मधील सार्वजनिक बांधकाम विभाग ऑफिस लोणंद, ते मनोज जमदाडे ते चाफळकर प्लॉट पर्यंत मनोज जमदाडे, डॉ. महानवर, महादेव सॉ मिल, डॉक्टर महाजन, कृष्णा तात्या शिंदे या सर्वांच्या घरा मागून बंदिस्त गटार बांधणे या विकास कामासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील व ज्येष्ठ नेते मिलिंद दादा पाटील यांच्या सहकार्यातून व प्रभाग ०६ च्या नगरसेविका सौ. राजश्री रवींद्र शेळके यांच्या पाठपुराव्यातुन मंजुरी मिळाली होती. या विकास कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नेते मिलिंददादा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला .
यावेळी मा. नगराध्यक्षा सौ. मधुमती गालींदे मा. उपनगराध्यक्ष गणीभाई कच्छी, नगरसेवक शिवाजीराव शेळके, सचिन शेळके, राजश्री रवींद्र शेळके, दिपाली निलेश शेळके, दिपाली संदीप शेळके, तृप्ती घाडगे, रिटायर्ड अॅडिशनल एस पी राजेंद्र शेळके, राजेंद्र डोईफोडे, राहुल घाडगे, सागर गालिंदे, निलेश शेळके, बबनराव शेळके, हनुमंतराव शेळके , रमेश शेळके, रमेश काका शेळके, किसन बापू शेळके, संदीप शेळके, असगर इनामदार, अॅड गणेश शेळके, मोहनराव शेळके, मिठूभाई पटेल, लखमसी पटेल, सुनील शहा, दीपक डोणीकर, भाऊसाहेब शेळके, क्रिष्णा पवार, सत्वशील शेळके आमोद शेळके, सुरेश चव्हाण, नरसिंग साळुंखे, मनोज जमदाडे, मदन यादव, हेमंत निंबाळकर, शंभूराज भोसले, रवींद्र धायगुडे, के.के. गायकवाड, डॉ. चंद्रशेखर महाजन, उदयकुमार जंगम, गजानन गाडे, सुरेश शेळके, दिलीप शेळके, आदी मान्यवर उपस्थित होते. ही त्यावेळची क्षणचित्रे.


