उत्कृष्ट पशुवैद्यकीय पुरस्कार दयाराम सूर्यवंशी यांना प्रदान.
लोणंद प्रतिनिधी: दिलीप वाघमारे
लोणंद – महाराष्ट्र पशु विज्ञान परिषद , महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पशुरोग निदान शास्त्र या प्रवर्गामध्ये उत्कृष्ट पशुवैद्यक
म्हणून लोणंद येथील ओमेगा लॅबोरेटरीचे संचालक डॉ . दयाराम सुर्यवंशी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला .
ADVERTISEMENT
महाराष्ट्र पशु विज्ञान परिषद यांचे पदाधिकारी, कुलगुरू महाराष्ट्र पशुविज्ञान विद्यापीठ आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल सायन्सचे डायरेक्टर यांच्या हस्ते नागपूर येथे डॉ . दयाराम सुर्यवंशी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला .
डॉ . दयाराम सुर्यवंशी यांचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले .


