भोर तालुक्यातील संगमनेरच्या सुपुत्राला मोठा मान! मनोज गायकवाड कारागृह पोलीस अधिकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सचिवपदी बिनविरोध निवड!


संपादक मंगेश पवार

कार्यकारी संपादक सागर खुडे

भोर, २६ जून (पुण्यभूमी प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि प्रभावी समजल्या जाणाऱ्या कारागृह पोलीस अधिकारी कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या., महाराष्ट्र राज्य या पतसंस्थेच्या निवडणुकीत स्वराज्य पॅनलच्या सर्व उमेदवारांनी यश मिळवल्यानंतर आज चेअरमन, सचिव आणि व्हा. चेअरमन या महत्वाच्या पदांवर बिनविरोध निवड करण्यात आली.

 

या निवडणुकीत चेअरमनपदी वसीम इनामदार, सचिवपदी मनोज गायकवाड आणि व्हा. चेअरमनपदी अतुल पटेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, सचिव मनोज हनुमंत गायकवाड हे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील संगमनेर गावचे सुपुत्र आहेत.

त्यांची कारागृह पोलिस पदावर २०१८ साली निवड झाली होती. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वाधिक मते मिळाली होती. ते सर्वांत तरुण उमेदवार म्हणूनही विशेष चर्चेत राहिले होते.

ADVERTISEMENT

 

आज झालेल्या पदनियुक्ती कार्यक्रमाला निवडणूक अधिकारी अमर देशपांडे, नविन चेअरमन वसीम इनामदार, व्हा. चेअरमन अतुल पटेकर, संचालक प्रमोद इंगळे, योगेश पाटील, प्रमोद जानराव, दौलत खिलारे, भरत बंडगर, साहेबराव वाळकुळे, प्रणाली कोकाटे, लीला धुमाळ, तसेच संस्थेच्या कर्मचारी प्रिया शिर्के, श्रुती शिर्के, हवा. दळवी, महिला पोलिस कर्मचारी दीपाली गोफणी यांच्यासह अनेक सभासद उपस्थित होते.

 

या यशाबद्दल मनोज गायकवाड यांना प्रहार जनशक्ती पक्षाचे राज्य उपाध्यक्ष अजय कांबळे यांनी खास शुभेच्छा दिल्या.

 

 “मनोज गायकवाड यांची सचिवपदी बिनविरोध निवड ही भोर तालुक्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. त्यांची कामाची चिकाटी आणि प्रामाणिकपणा संस्थेच्या प्रगतीसाठी मोलाचा ठरेल. त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!” – अजय कांबळे, प्रहार जनशक्ती पक्ष भोर उपाध्यक्ष 

 

 

 

नवीन नेतृत्वाच्या माध्यमातून संस्थेचा कारभार अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि सभासदहितकारी होईल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!