आनंद खेळाचा,जोश स्पर्धेचा.
सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी
बिभवी : आज भणंग केंद्राच्या स्व.यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा बिभवी येथे उत्साहात संपन्न झाल्या.या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ जावलीचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ साहेब यांच्या शुभहस्ते पार पडला.यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे साहेब, केंद्रप्रमुख मिलन मुळे साहेब,बिभवी गावचे सरपंच संतोष बांदल, उपसरपंच काजल परिहार,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर परिहार या मान्यवरांसह ग्रामपंचायत सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,ग्रामस्थ,पालक,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.आनंदाबरोबर जोश दाखवत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळ केला.तर शिक्षकांनी नियोजनबद्ध कामकाज करीत स्पर्धा उत्तमप्रकारे पार पाडल्या.बिभवी ग्रामपंचायत,शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ यांनी कौतुकास्पद लोकसहभाग दाखवला.वरुणराजाने बरसत क्रीडा स्पर्धेत रंगत आणली आणि सांगता झाली.


