झाडाला गळफास घेऊन 29 वर्षे युवकाची आत्महत्या
नसरापूर : करंदी येथे राहणाऱ्या उदय रवींद्र बोरगे वय २९ वर्ष रा. करंदी खेबा ता. भोर जि. पुणे या युवकाने ३०/५/२४ रोजी सकाळी ९:३० वा. पूर्वी शेतात आंब्याच्या झाडाच्या फांदीला नायलॉन दोरीने फाशी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याबाबत राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दि.३०/५/२४ रोजी सकाळी ९:३० च्या सुमारास गावातील साहिल गायकवाड यांनी शहाजी बोरगे यांना घरी येऊन सांगितले की, तुझा चुलत भाऊ उदय रवींद्र बोरगे याने सोळपट्टी नावाच्या शेतात आंब्याच्या झाडाच्या फांदीला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन लटकत आहे, तरी तू चल असे सांगितल्यावर शहाजी बोरगे यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहून खात्री करून गावातील लोकांच्या मदतीने त्यास खाली उतरवून घेऊन उपचारास सिद्धिविनायक हॉस्पिटल नसरापूर येथे घेऊन आले असता तेथे डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले आहे. त्यानंतर राजगड पोलीस स्टेशन मध्ये जाऊन शहाजी दिलीप बोरगे वय ३३ वर्ष यांनी खबर दिली आहे.
याचा अधिक तपास स. फौजदार ढावरे करीत आहेत.


