मध्य रेल्वे कोल्हापूर ते सातारा या भागातील पूरस्थिती लक्षात घेता १४ अनारक्षित विशेष सेवा आणि कोल्हापूर ते मिरज दरम्यान १४ अनारक्षित विशेष सेवा चालवणार आहे .


 

उपसंपादक :दिलीप वाघमारे

प्रवाशांच्या सोयीसाठी निवडक स्थानकांवर काही गाड्यांना तात्पुरता थांबाही देण्यात आला

मध्य रेल्वे कोल्हापूर-सातारा पट्ट्यातील अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन एकूण २८ अनारक्षित विशेष सेवा चालवणार आहे.

कोल्हापूर ते सातारा दरम्यान १४ विशेष आणि

कोल्हापूर ते मिरज दरम्यान १४ विशेष सेवा. तपशील खालीलप्रमाणे आहेतः

१. कोल्हापूर- सातारा अनारक्षित विशेष (१४ फेऱ्या)

गाडी क्रमांक 01412 अनारक्षित विशेष गाडी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून दि. ०७.०८.२०२४ ते दि. १३.०८.२०२४ पर्यंत दररोज ०८.४० वाजता सुटेल आणि सातारा येथे त्याच दिवशी १३.२५ वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01411 अनारक्षित विशेष सातारा येथून दि. ०७.०८.२०२४ ते दि. १३.०८.२०२४ पर्यंत दररोज १४.२० वाजता सुटेल आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे त्याच दिवशी १८.३५ वाजता पोहोचेल.

थांबे:वळीवडे, रुकडी, हातकणंगले, जयसिंगपुर, मिरज, विश्रामबाग, सांगली, नंदरे, भिलवडी, किर्लोस्करवाडी, तकरी, भवानी नगर, शेणोली, कराड, शिरवडे, मसूर, तारगांव, रहिमतपुर आणि कोरेगांव

संरचना: २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह ५ शयनयान आणि ७ सामान्य द्वितीय श्रेणी.

२. कोल्हापूर- मिरज अनारक्षित विशेष (१४ फेऱ्या)

गाडी क्रमांक 01416 अनारक्षित विशेष गाडी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून दि. ०७.०८.२०२४ ते दि. १३.०८.२०२४ पर्यंत दररोज २०.१५ वाजता सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी २१.२५ वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१४१५ अनारक्षित विशेष मिरज येथून दि. ०७.०८.२०२४ ते दि. १३.०८.२०२४ पर्यंत दररोज ०६.५५ वाजता सुटेल आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे त्याच दिवशी ०८.०५ वाजता पोहोचेल.

ADVERTISEMENT

थांबे: वळीवडे, रुकडी, हातकणंगले आणि जयसिंगपुर

संरचना: २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह ५ शयनयान आणि ७ सामान्य द्वितीय श्रेणी.

खालील स्थानकांवर काही गाड्यांना तात्पुरते थांबे देण्यात आले आहेत.

खालील गाड्यांना दि. ०६.०८.२०२४ ते दि. १२.०८.२०२४ पर्यंत निवडक स्थानकांवर तात्पुरते थांबे देण्यात आले आहेत:

भिलवडी आणि किर्लोस्करवाडी स्थानकांवर थांबा

ट्रेन क्रमांक 16210 म्हैसूर – अजमेर एक्स्प्रेस

ट्रेन क्रमांक 16506 बेंगळुरू – गांधीधाम एक्स्प्रेस

ट्रेन क्रमांक 16508 बेंगळुरू – जोधपूर एक्स्प्रेस

गाडी क्रमांक 16532 बेंगळुरू – अजमेर एक्स्प्रेस

ट्रेन क्रमांक 16534 बेंगळुरू – जोधपूर एक्स्प्रेस

तकरी स्थानकावर थांबा-

गाडी क्रमांक 11029 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस

गाडी क्रमांक 11030 कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोयना एक्स्प्रेस.

गाडी क्रमांक 11039 कोल्हापूर – गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस

गाडी क्रमांक 11040 गोंदिया – कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस

कराड स्थानकावर थांबा.

ट्रेन क्रमांक 16533 जोधपूर – बेंगळुरू एक्स्प्रेस

ट्रेन क्रमांक 16534 बेंगळुरू – जोधपूर एक्स्प्रेस

गाडी क्रमांक 11049 अहमदाबाद – कोल्हापूर एक्स्प्रेस

ट्रेन क्रमांक 11050 कोल्हापूर – अहमदाबाद एक्स्प्रेस

 

प्रवाशांनी कृपया नोंद घ्यावी आणि सेवांचा लाभ घ्यावा अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

———–

दिनांक: ६ ऑगस्ट २०२४

प्रप क्रमांक: २०२४/०८/०९

सदर प्रसिद्धी पत्रक जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!