बेस्ट पोलीस ठाणे पुरस्कारांने उंब्रज पोलीस ठाणेचा गौरव, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख,
संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. सातारा जिल्हा पोलीस दलातील उंब्रज पोलीस ठाणे हे बेस्ट पोलीस ठाणे ठरले आहे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकाऱ्यांसह पोलीस ठाणेतील कर्मचारी देखील नेहमीच प्रयत्नशील आहेत, सातारा जिल्हा पोलीस दलाकडून प्रत्येक पोलीस ठाणेच्या कामगिरीचा आढावा घेवुन चांगली कामगिरी असणाऱ्या पोलीस ठाणेला प्रशस्तीक पत्रक देवुन त्यांचे मनोबल उंचावले जाते, उंब्रज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रवींद्र भोरे पो.हवा. संजय धुमाळ पो. हवा. टी.एच. कर्वेकर पो.हवा. पी.आर पाटील, राजू कोळी यांचा प्रशस्तीकपत्रक देवुन जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला,

 
			
 
					 
							 
							