निमगांव केतकी गावात 33 वर्षीय विवाहित महिलेचा अनैतिक संबंधातून खुन, इंदापूर पोलिसांनी आरोपीला केली अटक आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर,
संभाजी पुरीगोसावी ( पुणे जिल्हा) प्रतिनिधी. इंदापूर तालुक्यांतील निमगांव केतकी या गावातून धक्कादायक प्रकार समोर आला, असून चाकूने सपासप वार करून 33 वर्षीय महिलेचा खून करण्यात आला आहे, सुनिता दादाराव शेंडे असे खून झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे, याप्रकरणी आरोपी ( ज्ञानेश्वर बबन रासकर रा. सुरवड ता. इंदापूर जि. पुणे ) यांच्या विरोधांत इंदापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असून सदर आरोपी स्वतःहून इंदापूर पोलीस स्टेशनला हजर झाला, ही घटना दिनांक. 4 डिसेंबर रोजी सव्वा आठ ते साडेआठच्या सुमारांस निमगांव केतकी सराफवाडी रोडवरील आजिनाथ मोरे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये घडली आहे, आरोपी ज्ञानेश्वर बबन रासकर यांचे महिलेची अनैतिक संबंध होते. याच कारणांवरून सुनिता दादाराव शेंडे यांच्या डोक्यात पोटावर, छातीवर, हातावर चाकूने सपासप वार केले, यात सुनिता दादाराव शेंडे या गंभीर जखमी झाल्या होत्या उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला, सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार पुंडलिक गावडे करीत आहेत.

 
			
 
					 
							 
							