कुलदीप कोंडे युवा मंचच्या माध्यमांतून आणि भोर राजगड कला क्रिडा-मैत्री प्रतिष्ठानतर्फे व्याख्यांमालेच आयोजन…


 

कार्यकारी संपादक :सागर खुडे

भोर : सध्याचे युग हे सोशल मीडिया, मोबाईल, टेलिव्हिजनचे आहे. यामुळे आपली किशोरवयीन मुले व मुलींच्या मनावर विचित्र परिणाम होत आहेत. या गोंधळलेल्या स्थितीतून त्यांना सावरण्यासाठी त्यांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. जेव्हा १४ ते २१ वयोगटातील किशोरवयीन मुले आणि मुली चांगले विचार आत्मसात करतील, तेव्हाच समाजातील चित्र बदलेल. आणि अनुचित प्रकार कुठेतरी थांबतील. आणि वडिलांच्या नावाला फासला जाणारा कलंक कुठेतरी नाहीसां होण्यानिमित्त भोर तालुक्याचे शिवसेनेचे नेते आणि पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य कुलदीप कोंडे यांच्या मार्गदर्शनातून कुलदिप कोंडे युवा मंच,भोर राजगड कला क्रिडा प्रतिष्ठान तसेच माणुसकी प्रतिष्ठान तर्फे भोरेश्वर लॉन्स बुधवार दि.७ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान सुप्रसिद्ध ख्यातनाम समाजप्रबोधनकार आणि वक्ते वसंत हंकारे यांनी सर्व शालेय मुलामुलींना “संघर्षातून परिवर्तनाकडे आणि परिवर्तनातून प्रगतीकडे-बाप समजून घेताना” अशा एका लघुचर्चित विषयावर संबोधन केले.खरंतर एक बाप आयुष्यात किती महत्वाचा असतो???

जो पडद्याआडून अप्रत्यक्षपणे तो आपल्या कुटुंबावर आपल्या छायाछत्राची सावली टाकत असतो आणि अशाच मायेची सावली टाकणाऱ्या एका अडगळीत पडलेल्या बापाबद्दलच्या ज्वलंत विषयावर व्याख्यानमाला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

याक्षणी कुलदिप तात्या कोंडे समाज माध्यमांशी बोलत असताना “माणुसकीचा धर्म पाळण्यासाठी मदतीसाठी हात पुढें करत अनाथ आणि गरजू विद्यार्थी आणि विद्यार्थीनीना शिक्षणासाठीच्या गरजांची पूर्तता करून देण्यासाठी मी कटिबध्द आहे,आणि अशांना खंबीरपणे पालकत्व देणार असल्याचे प्रतिपादन केले.

प्रसंगीच्या कार्यक्रमास कुलदिप तात्या कोंडे युवा मंचचें कार्यकर्ते अमोल पांगारे, पेंजळवाडी गावचे मा. युवा सरपंच विकास चव्हाण,राजेंद्र शास्त्री, नितीन सोनवले, दीपक बर्डे, दशरथ जाधव, तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी जिल्हा परिषद सदस्य शलाका कोंडे, बाळासाहेब जायगुडे, अनिल भेलके, गणेश धुमाळ, विशाल जाधव, बंटी जगताप, दिलीप तनपुरे,आबा कोंडे, कांजळे गावचे सरपंच नाना जाधव आदींसह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित असलेला पाहवयास मिळाला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!