वंचित बहुजन आघाडीचे भोर ता.प्रमुख यांच्यासह कार्यकर्त्यांचा संग्राम थोपटेंच्या उपस्थित काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश.
दि. २० भोर : तालुक्यातील मौजे भोलावडे येथील वंचित बहुजन आघाडीचे भोर तालुका प्रमुख गणेश सुदाम जाधव यांच्यासह नवनाथ बबन शिंदे, अनिल सुरेश आडुळकर, संदीप बाळू शिंदे, समीर दत्तात्रय शिंदे, कुणाल राजू शिंदे, अक्षय शिवाजी खंडाळकर, आकाश संजय मराठे, दगडू मन्याबा मराठे, सुजल संपत जाधव, संतोष पांडुरंग जाधव, विलास तुकाराम लाळे, संतोष गोविंद आडुळकर, ऋषिकेश किसन रांजणे, दिनेश ज्ञानोबा लाळे, प्रज्वल प्रभाकर शिंदे, राहुल गंगाराम चव्हाण, दीपक सुदाम जाधव, तानाजी सुदाम जाधव यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी सर्वांचे स्वागत व अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आनंदा आंबवले, संचालक भाऊ मळेकर, भीम आर्मी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र साळुंखे, दत्तात्रय गावडे, अनिल डोंबे, सुनील अण्णा चव्हाण, सुनील आवाळे, राजेंद्र आवाळे, गणेश शंकर आवाळे, मिलिंद आवाळे, सत्यवान आवाळे, मंगेश कुंभार, पिंटू दाभाडे, रघुनाथ पारठे, शरद डोंबे, राजू मळेकर, भगवान मळेकर, रितेश राठवडे आदी उपस्थित होते.


