पाटण तालुक्यातील सर्व गावांतील, डोंगर-पठारांवरील धनगर समाज मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार.
उपसंपादक: दिलीप वाघमारे
पाटण तालुक्यातील धनगर समाजातील कार्यकर्ते व समाजबांधवांनी मंगळवारी दि. ६ रोजी पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांची मुंबईतील त्यांच्या पावनगड निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. पाटण तालुक्यातील सर्व गावांतील, डोंगर-पठारांवर राहणारा धनगर समाज एकमताने मा. ना. शंभूराज देसाई यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असा विश्वास यावेळी कार्यकर्ते व समाजबांधवांनी व्यक्त केला. गेल्या पाच वर्षांत पाटण तालुक्यात झालेल्या रस्त्यांच्या व अन्य विकासकामांवर यावेळी सर्वांनी समाधान व्यक्त केले आणि मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या विकासाच्या राजकारणाला आपला कायम पाठिंबा असल्याचा निश्चय सर्वांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी मा. ना. शंभूराज देसाई यानी उपस्थितांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. पाटण तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे मा. ना. शंभूराज देसाईनी यावेळी आश्वस्त केले.


