आगामी काळात शिक्षण संचालनामध्ये दिसणार निवेदक विठ्ठल पवार :- शिक्षण संचालक ज्योती परिहार.


कार्यकारी संपादक : सागर खुडे

पुणे( प्रतिनिधी):-

निवेदक विठ्ठल पवार यांनी सेवापूर्ती समारंभा प्रसंगी केलेले सूत्रसंचालन अतिशय उत्कृष्ट आहे, त्यांच्या सूत्रसंचालनात एक जान आहे आणि त्यांचे अचूक सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाला एक वेगळी शोभा व उंची निर्माण झालेली आहे. निवेदक विठ्ठल पवार हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत, आणि ते उत्कृष्ट निवेदक आहे ,याचा मला सार्थ अभिमान आहे ,आगामी काळात पुणे विभाग शिक्षण संचालनामध्ये मोठी संधी देण्यात येईल असे प्रतिपादन पुणे विभागाच्या सहाय्यक संचालक ज्योती परिहार यांनी केले.

 

 

मांगडेवाडी ता. हवेली येथील माऊली गार्डन मंगल कार्यालयात शिवरे केंद्राच्या केंद्रप्रमुख पद्मजा नाईक यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ पंचायत समिती भोर शिक्षण विभाग यांच्या वतीने व शिवरे केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आला होता, याप्रसंगी ज्योती परिहार बोलत होत्या. ज्योती परिहार पुढे बोलताना म्हणाले की, काही निवेदक पाल्हाळपणे स्वतःचे ज्ञान पाजळत बसतात आणि वेळेचं भान राखत नाहीत उगाच डोक्यात आलेले विचार भरभर पटापट सादर करणे , हे काम करतात,

मात्र निवेदक विठ्ठल पवार यांचे अचूक वेळेत अचूक शब्दांच सादरीकरण अत्यंत कमीत कमी शब्दात आणि कमीत कमी वेळेत ते देखील प्रभावीपणे झाले आहे, त्यांच्याबद्दलची माहिती मी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून घेतली तर विठ्ठल पवार यांना आगामी काळात शिक्षण संचलनामध्ये मोठी संधी दिली जाणार आहे, असेच सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये तुम्ही मोठे व्हा,अश्या शुभेच्छा देत विठ्ठल पवार यांचा उत्कृष्ट निवेदक म्हणून सत्कार करत गौरविण्यात आले.

 

 

या कार्यक्रमासाठी पुणे विभागाच्या सहाय्यक शिक्षण संचालक ज्योती परिहार, भोर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी नेहा बनकर ,रतन गायकवाड समुद्रे मॅडम मा. केंद्रप्रमुख स्नेहलता जगताप, प्रज्ञा क्षिरसागर, भोरच्या केंद्र मंगल खुटवड , केंद्रप्रमुख मुल्ला सर ,पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष पोपटराव निगडे, रोहिदास मेमाणे, शिक्षक नेते संतोष कडाळे,भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुनील लेकावळे, शिक्षक समितीचे नेते संचालक सुरेश खोपडे ,सुदेव नलावडे, संदीप दानवले, पालकर सर,भोर हवेली दौंड बारामती इंदापूर मावळ मुळशी तालुक्यातील आजी-माजी शिक्षक मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक,नातेवाईक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

मी पुणे विभागामध्ये फिरत असताना शिक्षकांच्या अंगी असलेले वेगवेगळे कला कौशल्य मी हेरत असते आणि त्यांना आपल्या शिक्षण संचालनामध्ये राज्यांमध्ये संधी कशी मिळेल या दृष्टीने मी प्रयत्न करीत आहे. या कार्यक्रमात एक उत्कृष्ट निवेदक मला दिसला त्यामुळे विठ्ठल पवार यांना निवेदक म्हणून आगामी काळात संधी दिली जाणार आहे.

पुणे विभागाच्या सहाय्यक संचालक ज्योती परिहार


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!