दिव्यांग निधी वाटप प्रकरणी तक्रारदाराची दोन तास चौकशी! नसरापूर ग्रामपंचायत येथील प्रकार
कार्यकारी संपादक : सागर खुडे
नसरापूर : विभागीय आयुक्त यांच्याकडे दि. १/५/२४ रोजी दिव्यांगाच्या ५% अनुशेषाच्या संदर्भात अर्ज केला होता त्या अनुषंगाने मा. विभागीय आयुक्त यांनी जिल्हा परिषद पुणे यांना ९/५/२४ कारवाईच्या अनुषंगाने अहवाल मागितला होता त्या अनुषंगाने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी २४/६/२४रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती वेल्हा मा. पंकज शेळके यांना चौकशीकामी नेमले असून त्यांनी दि. ३०/७/२४ रोजी गटविकास अधिकारी भोर यांना पत्र देऊन दि. ६/८/२४ रोजी उपस्थित राहण्याच्या अनुषंगाने दिले होते त्या आधारे गटविकास अधिकारी भोर पंचायत समिती यांनी मला पत्र देऊन चौकशीकामी हजर राहण्याच्या सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने आज रोजी मी सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये उपस्थित होतो परंतु त्यावेळी ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य उपस्थित राहिले नाहीत चौकशीकामी मा. पंकज शेळके यांनी माजी दोन तास चौकशी करून माझा कडून लिखीत जात-जबाब तीन पाणी घेतला असून असून त्यांनी दप्तर तपासणीच्या अनुषंगाने मा. ग्रामसेवक विजय कुमार अशोक कुलकर्णी यांना मागितली असता त्यांनी दोन दिवसाची मुदत घेऊन माझा माणूस तुमच्या ऑफिसला कागदपत्रे पाठवेल असे तोंडी सांगितले त्यामुळे तपासणी व चौकशी कामे नसरापूर ग्रामपंचायतचे कार्यकारी मंडळ सदस्य व ग्रामसेवक विस्तार अग्रा ग्रामसेवक अधिकारी यांनी गांभीर्यांनी दखल घेतलेली दिसून येत नाही यावर चौकशी अधिकारी यांनी संबंधितावर काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे आणि तक्रारदार यांचे लक्ष लागू नये तरी ३९ अंतर्गत ग्रामपंचायत नसरापुर कार्यकारी मंडळावर कारवाई होणार की नाही याचे उत्तर येणारा काळच ठरवेल.