खंडाळा- शिवाजीनगर येथे जगविख्यात साहित्यिक थोर समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०४.वी जयंती उत्साही वातावरणात साजरी.


 

खंडाळा प्रतिनिधी : धर्मेद्र वर्पे.

 

जगतविख्यात साहित्यिक थोर समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती लहुजी शक्ती सेना शाखा शिवाजीनगर ता.खंडाळा यांचेवतीने पुरषोत्तम जाधव जिल्हाप्रमुख शिवसेना सातारा भूषण शिंदे तालुकाप्रमुख, बाळासाहेब जाधव जिल्हाध्यक्ष, लहुजी शक्ती सेना सातारा यांचे उपस्थिती मध्ये उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.यावेळी जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले यावेळी समाजाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विचारावर वाटचाल करावी त्यांनी वंचित गोर गरीबाच्या कष्टकऱ्यांच्या व्यथा आपल्या लिखाणातून मांडल्या आजच्या दिवशी अण्णाभाऊ यांना अभिवादन करून आपण सर्वजण निर्धार करूया की कायम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व आद्य क्रांती गुरु लहुजी साळवे यांच्या विचारांची ज्योत कायम तेवत ठेवू या महायुतीचे सरकार मातंग समाजाच्या उन्नतीसाठी विविध योजना राबवतआहे त्याचा लाभ घेऊन आपली प्रगती साधावी लहुजी शक्ती सेना ही संघटना जिल्हात बाळासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली ताकतीने काम करत असून महायुतीचा घटक पक्ष म्हणून त्यांनी चांगली भूमिका पार पाडली आहे त्यांना भविष्यात सर्वतोपरी सहकार्य करणार

ADVERTISEMENT

यावेळी भूषण शिंदे यांनी महायुती शासनाच्या माध्यमातून समाजासाठी झालेल्या आर्टीच्या स्थापने संदर्भात व महायुती शासनातील पक्षाकडून मातंग समाजाला प्रतिनिधित्व दिल्याचे सांगून समाजाने शिक्षण घेऊन आर्टीचा लाभ घ्यावा.लहुजी शक्ती सेना सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने समाजातील विविध अडचणी व विकासकामा संदर्भात मागणी केली व शासनाच्या माध्यमातून त्या योजना सोडवण्यासाठी मदत करावी अशी मागणी केली तसेच शासनाने आर्टिची स्थापना केल्याबद्दल व आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुणे येथील स्मारकसाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला

यावेळी धनाजी डेरे मा.संचालक ,किसनवीर कारखाना खंडाळा,हर्षवर्धन भोसले सरपंच शिवाजीनगर,कैलास भिसे तालुका अध्यक्ष लहुजी शक्ती सेना खंडाळा सदस्य, ग्रामपंचायत अंदोरी शोभा भोसले उपसरपंच ,सुजित डेरे सर सदस्य, ग्रामपंचायत शिवाजीनगर, सलिता सपकाळ सदस्या ग्रामपंचायत शिवाजीनगर यांनी मार्गदर्शन केले.यावेळी अभिषेक सपकाळ यांना लहुजी शक्ती सेना युवक आघाडी सचिव या पदाचे नियुक्तीपत्र साहेबांचे हस्ते देण्यात आले कार्यक्रमासाठी बाळासाहेब भोसले,संतोष भोसले,सत्यवान भोसले,सचिन धायगुडे मा. सरपंच खेड,नामदेव साळुंखे, हनुमंत सोनावणे,नामदेव भोसले, भगवान सपकाळ,बापूराव सपकाळ,सुरेश सपकाळ, नारायण सपकाळ,बाळकृष्ण सपकाळ,ओंकार सपकाळ हरिभाऊ सपकाळ मारुती सपकाळ,बाळासाहेब खुंटे व ग्रामस्थ उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!