स्मशानमूमीतील अतिक्रमण काढण्यासाठी सांगवी सरपंचांचे तहसीलदारांना निवेदन.
खंडाळा प्रतिनिधी : धर्मेंद्र वर्पे
खंडाळा तालुक्यातील सांगवी ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक स्मशानभूमीच्या जागेत गट क्र.२ मधील ०.४५ क्षेत्र सांगवी गावचा मसनवटा अशी नोंद असताना सदरील जागेवर गावातीलच किशोर कोंडीबा कांबळे यांनी अतिक्रमण करत संपूर्ण गट क्र.२ च वहिवाटीस वापरात घेतला आहे.
गावातील स्मशाणभूमीत अतिक्रमण झाल्याने संपूर्ण ग्रामस्थांची अंतिमसंस्कार करण्यासाठी अडचण निर्माण झाल्याने ग्रामस्थांमधे असंतोष वाढला आहे.या अतिक्रमणाबाबत गावाने अनेकदा मोजणीसाठी अर्ज केला होता.मात्र सदर व्यक्तीने वारंवार मोजणीच होऊ न दिल्याने यावर तोडगा निघाला नाही.
सदर अतिक्रमण करणारे मागासवर्गींय समाजाची असून संपूर्ण गावाला वेठीस धरल्याने ग्रामस्थ अत्यंत त्रस्त झालेले आहेत.ही समस्या शासकीय स्तरावर सोडवण्यासाठी सांगवी गावचे सरपंच सोमनाथ सुरेश लोखंडे यांनी व उपसरपंच संदीप मुरलीधर वीर,सांगवी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष सुनिल गायकवाड,तसेच मोहन वीर,निलेश वीर,स्वप्निल वीर,शुभम वीर घेऊन खंडाळा तहसीलदार अजित पाटील यांना निवेदन दिले.
सदर निवेदनाची दखल घेवून तात्काळ कारवाई करून स्मशानभूमीच्या जागेची मोजणी करून जागा गावाच्या ताब्यात द्यावी अन्यथा सांगवी ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


