आमदार श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच जावळी तालुक्याचे मुख्य ठिकाण मेढा नगरीत गुलालाची उधळण करत पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंद साजरी केला


 

सातारा जिल्हा प्रतिनिधी : बजरंग चौधरी

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी तालुक्याच्या ऐतिहासिक तालुक्याचे मुख्य ठिकाण मेढा नगरीमध्ये सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच मेढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करत, गुलालाची उधळण करत एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला जावली तालुक्यातील केळघर , कुडाळ , आणेवाडी , करहर या बाजारपेठेतील गावात शिवेंद्रराजेंनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आनंद उत्सव साजरा केला

विधानसभेच्या निवडणुका झाल्यापासून पाच वेळा निवडून आलेल्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मंत्रीपद मिळण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी मागणी केली होती तसेच छत्रपतींच्या गादीचा सन्मान युती शासनाने करावा अशी तमाम महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती याच पार्श्वभूमीवर मतदार संघातील जनतेच्या नजरा शिवेंद्रसिंह राजेंच्या मंत्रिपदावर लागल्या होत्या आज दुपारी शिवेंद्रसिंहराजेंना मंत्री पद मिळणार याची खात्री झाल्यावर मेढा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली

ADVERTISEMENT

उद्योजक विजयपसेला माजी जिल्हा परिषद सदस्य मच्छिंद्र क्षीरसागर माजी उपसभापती कांतीबाई देशमुख भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल देशपांडे महिला अध्यक्ष गीता लोखंडे माजी नगराध्यक्ष पांडुरंग बापू जवळ उपनगराध्यक्ष दत्ता नाना पवार नगरसेवक विकास देशपांडे , शशिकांत गुरव ,बजरंग चौधरी , शिवाजीराव गोरे , भाजपा शहराध्यक्ष संजय सपकाळ , नाना कदम, सुरेंद्र पंडित , मधुकर शेलार , प्रमोद पार्टे , इम्रान अतार , बाबुशेठ पवार ,शंकर देशमुख , सुरेश बुवा जवळ , विशाल शेडगे , मधूकर शेलार , वैशाली सावंत,संदिप पवार , सदाशिव जवळ आधी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली व एकमेकांना कंदी पेढे भरवून जल्लोष साजरा केला

 

उद्योजक विजय शेलार व माजी उपसभापती कांतीबाई देशमुख यांनी फुगड्या खेळून आपला आनंद व्यक्त केला ]


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!