काँग्रेस सोशल मीडियाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी किकवी गावातील चेतन कोंढाळकर यांची निवड.
सारोळे : भोर तालुक्यातील किकवी गावातील युवा उद्योजक चेतन कोंढाळकर यांची पुणे जिल्हा काँग्रेस सोशल मीडियाच्या उपाध्यक्षपदी रविवार दि. ११ ऑगस्ट २४रोजी फार्मसी हॉल येथे निवड झाली आहे. भोर, राजगड, मुळशी कार्यसम्राट आमदार संग्राम थोपटे,मा.उपसभापती रोहन बाठे, काँग्रेस नेते शैलेश सोनवणे,पुणे जिल्हा युवक अध्यक्ष महेश टापरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
भोर तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात सोशल मीडिया द्वारे संवाद साधून काँग्रेस पक्ष तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून योग्य संदेश देऊन पारदर्शक, प्रतिसादात्मक कामातून नागरिकांना काँग्रेस पक्ष विषयी जागरूकता निर्माण करणार.
यावेळी भोर तालुका युवक अध्यक्ष नितीन दामगुडे, पुणे जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष तोसिफ अत्तार, काँग्रेस नेते अनिल सावळे, भोर खरेदी विक्री संचालक, ग्रामपंचायत मा. उपसरपंच महेश धाडवे,
किकवी गावातील अक्षय अहिरे, निखिल घारे, प्रथमेश अहिरे,अथर्व पाटणे,प्रशांत राजगुरू,हर्षद जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्य संपादक : मंगेश पवार
कार्यकारी संपादक : सागर खुडे

 
			

 
					 
							 
							