पुण्यनगरीचे नवनिर्वाचित खासदार, विद्यमान केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची नसरापूर पी.डी.सी बँकेस सदिच्छा भेट.
कार्यकारी संपादक : सागर खुडे
नसरापूर : पुण्यनगरीचे नवनिर्वाचित खासदार, विद्यमान केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधरआण्णा मोहोळ यांनी रविवार दि. ११ रोजी केळवडे आणि उंबरे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला सदिच्छा भेट दिली.
सोसायटीच्या चालणाऱ्या दैनंदिन कामकाजासंदर्भात आढावा घेतला आणि सोसायटीचे कामकाज अधिक गतिमान करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सोयी – सुविधा कशा मिळतील यासंदर्भात बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबरजी दुर्गाडे आणि संचालक भालचंद्रभाऊ जगताप आणि भोर तालुक्याचे सहाय्यक निबंधक तावरे तसेच मा. जि. प. सदस्य कुलदीप कोंडे यांच्याशी चर्चा केली. नवीन सूचनांची विचारणा करून त्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर जवळच असणाऱ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नसरापूर शाखेस सदिच्छा भेट देऊन बँकेचा कार्य अहवाल पाहून, कामकाजाबद्दल माहिती घेऊन समाधान व्यक्त केले. तसेच भविष्यात बँकेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. बँकेच्या वतीने अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबरजी दुर्गाडे व संचालक भालचंद्र जगताप यांनी तसेच सहकार खात्याच्या वतीने तावरे यांनी मुरलीधर मोहोळ यांचा सत्कार केला. त्याप्रसंगी समवेत पुण्याचे विभागीय सहनिबंधक सुर्वे, SRA चे घुगे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य जिवन कोंडे, भाजपचे ज्येष्ठ नेते जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य बाळासाहेब गरुड, भोरचे शिवसेना नेते कुलदीपतात्या कोंडे, भोर तालुका राष्ट्रवादी किसान सेलचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, शिवसेनेचे युवा नेते पेजलळवाडी मा सरपंच विकासबापू चव्हाण, केळवडे विकास सोसायटीचे चेअरमन राजेंद्र कोंडे, उंबरे विकास सोसायटीचे चेअरमन जालिंदर खुटवड, दैनिक सकाळ पत्रकार किरण भदे, दैनिक पुढारी माणिक पवार आणि त्यांचे इतर सहकारी, बँकेचे भोरचे विभागीय अधिकारी विनोद काकडे , विकास अधिकारी सदानंद सोनवणे व नसरापूर शाखेचे शाखाप्रमुख गाडे व बँक आणि सोसायटीचे इतर सर्व कर्मचारी, संचालक उपस्थित होते.

 
			

 
					 
							 
							