शासनाच्या फसवणूक करून बोगस कुणबी दाखला मिळवला! भोर तालुक्यातील माजगाव लव्हेरी गावातील प्रकार! फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी.
संपादक : मंगेश पवार
भोर : भोर तालुक्यातील माजगाव लव्हेरी येथील अर्जदार शरद लक्ष्मण पडवळ रा. लव्हेरी ता. भोर जि. पुणे यांनी बोगस कागदपत्रे देऊन कुणबी जातीचा दाखला काढला. अर्जदार यांनी दि. १३/७/२००७ ची पडताळणी करता तहसीलदार मार्फत दि. २२/१२/२०२० रोजी समितीकडे सादर केला होता. अर्जदार यांनी ग्रामपंचात माजगाव ता.भोर जि.पुणे या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूक २०२०-२१ करता सदर जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रकरण दाखल केले होते.
शरद पडवळ हे २०२०-२१ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नागरिकाचा इतर मागास प्रवर्ग या राखीव प्रवर्गातून ग्रामपंचायत माजगाव येथून सदस्य या पदावर निवडून आलेले आहेत.
यावेळी तक्रारदार रामचंद्र शंकर कोंढाळकर आणि लहुजी मालुसरे यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती पुणे यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता.जिल्हा समिती यांनी अर्जदार यांचे शाळेची नोंद, गाव नमुना नंबर १४ चा उतारा आणि वारस मध्ये चा उतारा पुराव्यांचा तपशील मध्ये नातेसंबंध सिद्ध झाले नाहीत.
या प्रकरणातील सर्व कागदपत्रांचा समितीने सर्वकष विचार केला असता,
अर्जदार शरद लक्ष्मणराव पडवळ यांचा कुणबी जातीचा दावा सिद्ध होत नाही. त्यामुळे तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज मान्य करून अर्जदार यांचा कुणबी जातीचा दावा जिल्हा जात पडताळणी समिती पुणे यांनी अमान्य केला व या जातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले. तसा सविस्तर आदेश पारित करण्यात आला.
फौजदारी गुन्हा दाखल करा अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष भोर यांच्या वतीने आंदोलनाचा इशारा.
बोगस कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक करून बोगस दाखला मिळवला त्यामुळे जिल्हा जात पडताळणी पुणे यांनी कुणबी दाखला अवैध ठरवला.शरद पडवळ यांच्या कार्यकाळातील कामाची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर शासनाची फसवणूक केली म्हणून फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे.नाहीतर
येणाऱ्या काळात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने भोर तालुक्यामध्ये जन आंदोलनाचा इशारा दिला आहे.
असे प्रहार जनशक्ती पक्षाचे उपाध्यक्ष भोर अजय कांबळे यांनी पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज यांच्याशी बोलताना सांगितले


