सेवा निवृत्त शिक्षक दुंदळे सर यांनी ५५५५ रुपये देऊन माझी शाळा आदर्श शाळा या उपक्रमांतर्गत लोकसहभागास प्रारंभ – अशोक लकडे मुख्यध्यापक
सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी
मेढा : सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने माझी शाळा आदर्श शाळा हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या उपक्रमांतर्गत जावली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिभवी या शाळेची निवड झाली आहे.माझी शाळा आदर्श शाळा या उपक्रमांतर्गत लोकसहभागाची अत्यंत आवश्यकता आहे.बिभवी प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या ग्रामस्थांच्या सभेत सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मण विठ्ठल दुंदळे यांनी ५५५५/- रुपये भणंग केंद्राचे केंद्रप्रमुख मिलन मुळे,बिभवी गावचे सरपंच संतोष बांदल,शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सागर परिहार, मुख्याध्यापक अशोक लकडे यांचेकडे सुपुर्द करीत लोकसहभागास प्रारंभ केला.यावेळी राजेंद्र जाधव,पांडुरंग वाघ,ग्रामपंचायत सदस्य कांताराम शिंदे,ग्रामसेवक चंद्रकांत कोळी,हनुमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रवीण देशमुख,प्रमोद बांदल,दत्तात्रय देशमुख हे ग्रामस्थ व दिपाली दुंदळे,अमिता एरंडे,राकेश बोडके हे शिक्षक उपस्थित होते.बिभवी प्राथमिक शाळेला आदर्श शाळा बनवण्यासाठी लोकसहभागाचे १० लाखांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून लोकांचा सहभाग वाढत आहे.लोकसहभाग मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करण्याचा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी केला आहे.
दुंदळे सर यांनी लोकसहभागास प्रारंभ केल्या बद्दल त्यांचे सरपंच ,उपसरपंच , सदस्य , व्यवस्थापन समिती अध्यक्ष , उपाध्यक्ष , सदस्य ग्रामस्थ यांनी त्यांचे कौतुक केले यावेळी दुंदळे सर यांनी ग्रामस्थांना आर्दश शाळा बनविण्यासाठी लोकसहभाग घ्यावा असेआव्हान केले .

 
			

 
					 
							 
							