महाबळेश्वर मध्ये विकेंडला पर्यटकांची गर्दी…..


 

उपसंपादक :दिलीप वाघमारे

महाबळेश्वर पांचगणी पर्यटकाचे माहेरघर असल्याने निसर्गरम्य पर्यटन स्थळी विकेंडला सुट्टी असल्याने पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. महाबळेश्वर मध्ये हलका व मध्यम पाऊस पडत आहे. तसेच वातावरणात गारठा वाढला आहे. हिरव्यागार वनश्रीने महाबळेश्वर चे रूप पूर्णपणे पालटले आहे. डोंगररांगा मधून उंचावरून वाहणारे धबधबे, दाट धुक्याची चादर पसरल्याने निसर्गाचे मनमोहक दृश्य पर्यटकांना पहावयास मिळत आहे. ठिकठिकाणी पावसात भिजण्याचा आनंद पर्यटक घेत आहे.

ADVERTISEMENT

वेण्णा लेक परिसर दाट धुक्यात हरवला आहे. पावसासह दाट धुक्यात पर्यटक फिरण्याचा आनंद लुटत आहे. वेण्णा लेक मध्ये पर्यटक बोटिंग करण्यासाठी गर्दी करत आहे. बोटिंग सह घोडे सवारी करत आहेत.

महाबळेश्वर मधील सर्वात उंच धबधबा म्हणून ओळखला जाणारा लिंगमळा धबधबा म्हणजे पर्यटकांना पर्वणीच असते. लिंगमळा धबधबा व नयनरम्य निसर्ग पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. प्रतापगड कडे जाताना आंबेनळी घाटात ठीक ठिकाणी उंचावरून कोसळणाऱ्या लहान मोठ्या धबधब्यावर देखील पर्यटक पहावयास मिळत आहेत. बाजारपेठ व विविध पॉईंटवर पर्यटकांची गर्दी वाढत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!