बोरगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कामगिरी! २४ तासात घरफोडीचा गुन्हा केला उघड.
सातारा : समीर शेख पोलीस अधिक्षक सो सातारा व श्रीमती आंचल दलाल, अप्पर अधिक्षक सातारा यांनी घरफोडीचे गुन्हे उघड करण्याच्या सुचना राजीव नवले उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा व रविंद्र तेलतुंबडे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरगाव पोलीस ठाणे यांना दिल्या होत्या त्याअनुशंगाने रविंद्र तेलतुंबडे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरगाव पोलीस ठाणे यांनी बोरगाव गुन्हे प्रकटीकरण शाखा यांना घरफोडीचे गुन्हे उघड करणेबाबतच्या सुचना दिल्या होत्या.
बोरगाव पोलीस ठाणे दि. २/५/२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुनह्यातील फिर्यादी यांची मौजे माजगाव ता.जि. सातारा येथुन राहते घरातुन लोखंडी कपाट चावीने उघडुन पर्स मधील सोन्याचा गंठण काळे मन्यासह असलेला ४९.७८० मिली ग्रॅम (४ तोळे ९.७८० मिली ग्रॅम) वजनाचे असलेला सोन्याचे गंठण कोणीतरी अज्ञात चोरट्याने मुद्दाम, लबाडीने, संमतीशिवाय चोरुन नेला असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. सदर गुन्ह्याचे अनुशंगाने सपोनि तेलतुंबडे यांनी स्वतः गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस
अंमलदार यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत योग्य त्या सुचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे डीबी पथकाने मौजे माजगाव ता.जि.सातारा येथे जावुन तक्रारदार यांचे घरी तसेच आजु बाजुस चौकशी केली त्यानंतर एका विधीसंघर्ष बालकाकडे कौशल्यपुर्ण चौकशी केली असता त्याने सदरचे सोन्याचे गंठण चोरी करुन गावातील ओळखीचे बाळासो बाबुराव बर्गे वय-५० वर्षे रा-माजगाव ता. जि. सातारा याचेकडे दिले असल्याचे सांगितले. त्यानंतर डीबी पथकाने सदर इसमास अटक करुन त्याचेकडे चोरीस गेले सोन्याचे गंठणबाबत विचारणा करुन सदर गुन्ह्यात चोरीस गेलेले सोन्याचे गंठण ४९.७८० मिली ग्रॅम (४) तोळे ९.७८० मिली ग्रॅम) वजनाचे मेमोरडम पंचनामाव्दारे जप्त करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा हा दाखल झालेनंतर डीबी पथकाने
२४ तासांत उघड केलेला आहे. समीर शेख पोलीस अधिक्षक सो सातारा व श्रीमती आंचल दलाल, अप्पर अधिक्षक सातारा, राजीव नवले उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा यांचे सुचनेप्रमाणे व रविंद्र तेलतुंबडे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोहवा दादा स्वामी, पोलीस नाईक प्रशांत चव्हाण, दिपककुमार मांडवे, पोकों केतन जाधव, पोकों विशाल जाधव यांनी सदरची कारवाई केलेली आहे. सदर
गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक प्रशांत चव्हाण हे करीत आहेत.
आरोपी नावे – १) बाळासो बाबुराव बर्गे वय-५० वर्षे रा-माजगाव ता. जि. सातारा


