सातारा जिल्हयातील सातारा शहर परिसरातील गुन्हे करणाऱ्या ०२ जणांच्या टोळीला सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता केले तडीपार.


 

सातारा :  जिल्हयामध्ये सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने शरिराविरुध्दचे तसेच मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे टोळी प्रमुख १) निकेत वसंत पाटणकर वय २८ वर्षे रा. चंदननगर कोडोली सातारा २) आकाश उर्फ गुंडचा ज्ञानेश्वर कापले, वय २८ वर्षे रा. दत्तनगर कोडोली सातारा, यांचे टोळीवर सातारा शहर पोलीस ठाणेस खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी करणे, घरफोडी, चोरी, सरकारी नोकरास मारहाण करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन मारहाण करणे, बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगणे, शिवीगाळ दमदाटी करणे असे गंभीर गुन्हे दाखल असल्याने तसेच सदर टोळीच्या बेकायदेशीर कृत्यांना आळा बसविण्यासाठी सातारा शहर पोलीस ठाणेचे तत्कालीन प्रभारी अधिकारी श्री. एम. जे. जगताप, पोलीस निरीक्षक, सातारा शहर पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पूर्ण सातारा जिल्हयातुन दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची

 

चौकशी, श्री किरणकुमार सुर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग यांनी केली होती. सदर टोळीतील इसमांचेवर दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांचेवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई

ADVERTISEMENT

 

करुनही त्यांचेवर गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. ते सातारा जिल्हयामध्ये सातत्याने गुन्हे करीत होते, त्यांचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळे सातारा शहर तसेच आसपासच्या परिसरातील लोकांना मोठया प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता, अशा टोळीवर सर्वसामन्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती.

 

वरील टोळीस मा. समीर शेख, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर सुनावणी होयुन त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पूर्ण सातारा जिल्हयातुन दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.

 

नोव्हेंबर २०२२ पासुन मपोकाक ५५ प्रमाणे २५ उपद्रवी टोळयांमधील ८१ इसमांना, मपोकाक ५६ प्रमाणे

 

२४ इसमांना, मपोकाक ५७ प्रमाणे ०२ इसमांना असे एकुण १०७ इसमांविरुध्द तडीपार सारखी कारवाई करण्यात आली असुन भविष्यातही आगामी लोकसभा निवडणुक २०२४ अनुशंगाने सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.

 

या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, श्रेणी पोउनि तानाजी माने पो. हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, सातारा शहर पोलीस ठाणेचे पो. हवा संदीप पवार, पोकों अमोल सापते यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!