भोर येथे रविवारी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जाहीर सभा. शरदचंद्र पवार आणि अजित पवार उद्या भोरमध्ये तोफ डागणार.
भोर : बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रचार अंतिम टप्प्यात असून महायुतीकडूनही नेत्यांच्या धडाका सुरू आहे. त्यामुळे रविवारी ५ मे रोजी बारामती लोकसभेचे उमेदवार सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या प्रचारार्थ सभेसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भोर शहरात सभा होणार आहे. तोफ डागणार आणि काय आव्हान करणार याकडे मतदारसंघाचे लक्ष असणार आहे.
तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सभेसाठी राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्र पवार, अमोल कोल्हे खासदार, नाना पटोले प्रदेशाध्यक्ष काँग्रेस, संग्राम थोपटे आमदार भोर राजगड मुळशी यांची सकाळी भोर येथे सभा आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान होत आहे. ही निवडणूक प्रामुख्याने सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातच होत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे.
आत्तापर्यंत दोन्ही उमेदवारांसाठी राष्ट्रीय नेते आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा सभा झाल्या. सध्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू असून अजूनही मोठ्या सभा सुरू आहे.
यामुळेच रविवार दि. ५ मे रोजी भोरमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सभा होत आहे.
भोर तालुक्यातील जनतेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार भोरच्या आरक्षित उत्रौली येथील एमआयडीसी बाबत काय बोलतात याकडे सर्व मतदारांचे लक्ष आहे.


