रोहित पवारांना ED चा सर्वात मोठा झटका.
प्रतिनिधी :पुण्यभूमी महाराष्ट्र
शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांना ईडीकडून मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या बारामती Agro या कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता आज ईडीने जप्त केल्याची माहिती दिली आहे. या कारवाईनंतर आता पवारांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
ADVERTISEMENT
कारखान्याची १६१ एकर जमीन ईडीने जप्त केल्याची माहिती एक्सवर पोस्ट करुन दिली आहे. ५०.२० कोटी रुपयांच्या या मालमत्तेवर ईडीने कारवाई करत जप्त केली आहे. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी रोहित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.


