सातारा जिल्हा गटसचिव संघटनेच्या उपाध्यक्ष पदी गोपाळ बेलोशे.


 

सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी

 

मेढा : महाराष्ट्र राज्य गटसचिव संघटनेचे सदस्य व पश्चिम महाराष्ट्र विभागीय गटसचिव संघटनेचे अध्यक्ष, फलटणचे संदीप कदम यांची सातारा जिल्हा गटसचिव संघटनेच्या अध्यक्षपदी तर जावळीचे गोपाळ बेलोशे व कोरेगावचे रघुनाथ तळेकर यांची उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

सातारा जिल्हा गटसचिव संघटनेची कार्यकारिणी बैठक नुकतीच पार पडली.सातारा जिल्हा गटसचिव संघटनेचे मावळते अध्यक्ष अब्दुल मुलाणी यांनी जिल्हा संघटनाध्यक्षपदाचा राजीनामा

दिल्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी बैठक होऊन निवडी बिनविरोध झाल्या

तसेच कार्याध्यक्ष पदी विठ्ठल हुंबे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. संघटनेचे सरचिटणीस म्हणून दिपक कचरे यांना कायम ठेवण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

सातारा जिल्हा गटसचिव पतसंस्थेचे माजी अध्यक्ष जेष्ठ नेते आनंदराव जुनघरे, कल्याण भोसले, माजी अध्यक्ष अब्दुल मुलाणी, जिल्हा केडरचे संचालक शंकर शिंदे, सातारा जिल्हा गटसचिव पतसंस्थेचे अध्यक्ष दादासाहेब माने, बाळासाहेब सोनवणे, बबनराव लोटेकर, दिपक साबळे, रवी जाधव, तानाजी कणसे, विकास भोसले, जिल्हा गटसचिव पतसंस्थेचे सचिव शामराव घोरपडे उपस्थित होते . जिल्हा संघटनेचे माजी अध्यक्ष अब्दुल मुलाणी यांनी वरीलप्रमाणे निवडी जाहीर केल्या उपाध्यक्ष पदी गोपाळ बेलोशे यांची निवड झाले बद्दल जावळी तालुका गटसचिव संघटना, विभागीय कार्यालय मेढा ( जावली ) यांचे वतीने सत्कार करणेत आला त्याप्रसंगी सहाय्यक निबंधक नानासो रुपवर ,विभागीय विकास अधिकारी राजेंद्र निकम,वसुली अधिकारी संजय निकम, जावळी तालुका अध्यक्ष अनिल धनावडे,विकास अधिकारी दत्तात्रय दुर्गावळे, प्रकाश झोरे, अरुण खटावकर, दिपक पार्टे, एजाज बागवान, प्रतापगड साखर कारखाना संचालक रामदास पार्टे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे सुनिल आण्णा धनावडे, दिपक महामुलकर, नरेश भिलारे तसेच सर्व सचिव उपस्थीत होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!