नारायणगांव पोलीसांची सतर्कता: वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने अवघ्या काही तासांत परत…! स.पो.नि. महादेव शेलार,


पुणे जिल्हा प्रतिनिधी : कलावती गवळी

नारायणगांव एसटी बस स्थानकांत प्रवासासाठी थांबलेल्या एका वृद्ध महिलेच्या पर्समधून सुमारे साडेतीन तोळे सोन्याचे मंगळसूत्र आणि अंगठी असे मिळून 2.66 लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले होते. नारायणगांव पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे अवघ्या काही तासांत आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे, यावेळी तिने चोरीस गेलेले दागिने देखील हस्तगत करण्यात आले आहेत. ही घटना ( दि. 28 जानेवारी 2025) रोजी दुपारी 2 वाजता नारायणगांव एसटी बस स्थानकांवर फिर्यादी पुष्पा देवकर या पुण्याच्या बसची वाट पाहत असताना त्यांच्या पर्समधील दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले तात्काळ त्यांनी नारायणगांव पोलीस ठाण्यात तक्रार दिली, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला, यावेळी पोलिसांनी नारायणगांव बस स्थानकांतील सी.सी.टीव्ही फुटजेची प्रथमता तपासणी केली असता, एक महिला पुष्पा देवकर यांच्या मागे सतत फिरत असल्यांचे निदर्शनास आले मात्र अवघ्या काही तासांत महिला पोलीस हवालदार सुवर्णा गाडगे यांनी संशयित महिलेची झडती घेतली असता, तिच्याकडून चोरीला गेलेले दागिने जप्त करण्यात आले, याप्रकरणी ( संध्या संतोष शेंडे (वय 45) रा. वर्धा ) हिला अटक करण्यात आली आहे, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क रहावे, पोलिसांच्या सूचनेचे पालन करावे, आणि सार्वजनिक सुरक्षेसाठी सहकार्य करावे असे आवाहन स.पो.नि. महादेव शेलार यांनी केले आहे,


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!