हरिश्चंद्री ब्रिज चे कामाला सुरुवात अखेर १० ते १२ वर्षाच्या आंदोलनांच्या लढ्याला यश
पुणे सातारा महामार्ग वरील हरिश्चंद्री येथील ब्रीज चे कामाला तात्काळ सुरूवात करावी. आपल्या अधिकारांच्या कडून/कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडूनच आज उद्या काम चालू होईल एवढं सांगून वेळ सारून मारून पुढे तारीख पे तारीख असा लपंडाव करून ग्रामस्थांची फसवणूक केली जाते आहे असा ग्रामस्थांचा आरोप आहे आणि काम नक्की चालू कधी होणार याची तोंडी तारीख दिली जाते परंतू प्रत्येक्षात त्या तारखेला काहीच होत नाही याचं प्रकरणाला कंटाळून ग्रामस्थ भव्य दिव्य लक्षवेधी १५ डिसेंबर २०२४ रोजी आंदोलन करणार असून त्याची दखल घ्यावी होणाऱ्या परिणामास राष्ट्रिय महामार्ग प्राधिकरण व कर्मचारी हे जबाबदार असतील. असे निवेदन ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांना १० डिसेंबर २०२४ रोजी दिले होते त्याची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग अधिकारी सुभाष घंटे व इतर अधिकारी तसेच निखिल कॉन्ट्रॅक्टर चे अधिकारी घोले व तानाजी हरुगळे व कामगार आणि हरिश्चंद्री ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हरिश्चंद्री ब्रीज च्या कामाला ग्रामस्थांच्या व भोर तालुक्याचे निर्भीड पत्रकार राम पाच काळे यांच्या हस्ते नारळ फोडून पूजन करण्यात आले त्याचबरोबर ग्रामस्थांना पेढे भरवत राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांनी आनंद व्यक्त केला व ग्रामस्थांना पेढे वाटले. या ब्रिज साठी हरिश्चंद्र येथील ग्रामस्थांनी तसेच पत्रकार राम पाचकाळे यांनी 12 वर्ष लढा दिला. आणि या लढाईमध्ये पत्रकार राम यांना आज रोजी यश आले. याबद्दल त्यांचे गावातून तसेच पंचक्रोशीत कौतुक केले जात आहे.
पोकल्यांड मशीनने तात्काळ कामाला सुरूवात करण्यात आली यावेळी ग्रामस्थांच्या मनामध्ये व चेहऱ्यावर आनंद पहावयास मिळाला.

 
			

 
					 
							 
							