बिजवडीत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न
संपादक : दिलीप वाघमारे
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बिजवडी शाखेत महिलांसाठी खास हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम बँकेचे चेअरमन खा नितीनकाका पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक रामराजे नाईक निंबाळकर,संचालक शेखरभाऊ गोरे, मुख्याधिकारी डॉ राजेंद्र सरकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला होता.
ADVERTISEMENT
यावेळी बँकेचे जनरल मॅनेजर राजेंद्र गाडवे, राजेंद्र भिलारे, विभागीय विकास अधिकारी भाऊसाहेब शिंगाडे, विस्तार अधिकारी बाबा लोंढे, बिजवडी शाखेचे कांतीलाल भुजबळ, विशाल घनवट, प्रथमेश पवार, विपुल देवकर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सध्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून खास सभासदांसाठी ठेव वाढ अभियान चालू करण्यात आले आहे तरी या अभियानामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे आव्हान करण्यात आले आहे.


