सारोळे जि. प. शाळेत भरतनाट्यमचा देखणा आविष्कार


मंगेश पवार

सारोळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भरतनाट्यम नृत्याचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. नामवंत भरतनाट्यम नर्तक डॉ. परिमल फडके यांच्यासोबत नक्षत्रा कुलकर्णी यांनी सादर केलेल्या भरतनाट्यम नृत्याने विद्यार्थ्यांसह उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता पापळ यांच्यासह विजयकुमार थोपटे, जया कांचन, कांचन थोपटे, जयश्री शिर्के, फरीदा पटेल, वंदना कोरडे, अर्चना वानखडे, नेताजी कंक आदी शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.

ADVERTISEMENT

 

डॉ. परिमल फडके हे ललित कला केंद्रातील सहाय्यक प्राध्यापक असून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर भरतनाट्यम सादरीकरणासाठी प्रसिद्ध आहेत. नक्षत्रा कुलकर्णी यांच्या साथीत सादर झालेल्या नृत्यातून शास्त्रीय नृत्याची शिस्त, भावाभिनय आणि लयबद्धता विद्यार्थ्यांना अनुभवता आली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय शास्त्रीय कलेविषयी आवड निर्माण झाली असून अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे शाळेच्या शैक्षणिक वातावरणाला नवी उंची मिळते, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!