निवडणुक काळात १८ गुन्हेगार तडीपार ; भुईज पोलीस स्टेशनची कारवाई .
वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण
समीर शेख, भा.पो.से. पोलीस अधीक्षक, सातारा, आँचल दलाल, भा.पो.से. अपर पोलीस अधीक्षक, सातारा तसेच बाळासाहेब भालचिम, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई विभाग यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक – २०२४ अनुषंगाने रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचेकडून सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या करीता अशा गुन्हेगारांवर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करणेबाबत आदेश पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिले होते. त्याप्रमाणे भुईज पोलीस ठाणे हददीतील रेकॉर्डवरील १८ गुन्हेगार यांचे हातुन दखलपात्र/अदखलपात्र स्वरुपाचा गंभीर अपराध होण्याची शक्यता असलेने, त्यांचेकडून सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्ननिर्माण होऊ नये या करीता त्यांना दि.०५/०५/२०२४ रोजीचे ००.०० वा. पासून दि. ०७/०५/२०२४ रोजीचे २४.०० वा. पर्यंत या कालावधीमध्ये सी. आर. पी. सी. १४४ (२) प्रमाणे भुईंज पोलीस ठाणेकार्यक्षेत्रात प्रवेश करण्यास मनाई करणेबाबत आदेश होणेकरीता प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी वाई विभाग, वाई यांना पाठवण्यात आले होते. त्यांप्रमाणे अभिलेखावरील खालील गुन्हेगार यांना सीआरपीसी १४४ ( २ ) प्रमाणे दि.०५/०५/२०२४ रोजीचे ००.०० वा. पासून दि ०७/०५/२०२४ रोजीचे २४.०० वा. पर्यंत भुईंज पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात प्रवेश करणेस मनाई करणेबाबचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी , वाई विभाग, वाई यांनी काढलेले आहेत. या दरम्यान सदर गुन्हेगार हे पोलीस ठाणे हददीत मिळुन आल्यास त्यांचेवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. भुईंज पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात दि.०५/०५/२०२४ ते दि ०७/०५/२०२४ या कालावधीमध्ये प्रवेश करण्यास मनाई असलेल्या इसमांची नामे –
१) अशोक वामन जाधव, रा. देगांव, ता. वाई, जि. सातारा.
२) अक्षय सयाजी सोनावणे, रा. विरमाडे, ता. वाई, जि. सातारा
३) अतुल सखाराम जाधव रा. विराटनगर-पाचवड, ता. वाई, जि. सातारा
४) हरीष जगन्नाथ बाबर, रा. उडतारे, ता. वाई, जि. सातारा
५) प्रतिक ऊर्फ अनुप संजिव जाधव, रा. भुईंज, ता. वाई, जि. सातारा
६) सागर सुरेश भोसले रा. शिरगांव, ता. वाई, जि. सातारा
७) साहिल विनोद गाढवे, रा. खालची आळी-सुरूर, ता. वाई, जि. सातारा
८) योगेश संदिप बाबर, रा. उडतारे, ता. वाई, जि. सातारा
९) अमोल यशवंत महामुलकर, रा. भुईंज, ता. वाई, जि. सातारा
(१०) रत्नाकर मधुकर क्षिरसागर, रा. भुईंज, ता. वाई, जि. सातारा
११) प्रतिक प्रकाश सुर्यवंशी, रा. भुईंज, ता. वाई, जि. सातारा
१२) प्रज्वल बाळकृष्ण पवार रा. भुईज ता. वाई जि. सातारा
(१३) गिरीश दिलीप दळवी रा. भुईज ता. वाई जि. सातारा
१४) संदिप सुरेश पवार, रा. भुईंज, ता. वाई, जि.सातारा.
१५) सुरज मुन्ना शेख, रा. भुईंज, ता. वाई, जि. सातारा
१६) अभिमन्यु शामराव निंबाळकर, रा. भुईंज, ता. वाई, जि. सातारा.
१७) सागर तुकाराम मोरे, रा. भुईंज, ता. वाई, जि. सातारा
१८) आरीफ सिकंदर मुल्ला, रा. भुईज, ता. वाई


