आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुईज पोलिसांचा रूट मार्च, नागरिकांनो,कायदा सुव्यवस्था राखावा : सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे


 

संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी.

ADVERTISEMENT

राज्यांत सध्या लोकसभा निवडणुकीच्या नंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे तसेच या निवडणुका शांततेत पार पडाव्यात तसेच आगामी सण उत्सव साजरे होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनही चांगलेच सतर्क झाले असून. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी सण, उत्सवांच्या काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच ग्रामीण भागात कुठेही अनुचित घटना घडू नये याकरिता शांतता व सुव्यवस्था कायम राहावी या उद्देशाने भुईज पोलिसांचा नुकताच रूट मार्च काढला आहे. सदर रूट मार्च हा भुईज पोलीस ठाणेपासुन पाचवड जांब शिरगांव देगांव चिंधवली सुरुर शेंदुर्जन ग्रामीण भागातील गावांमधून रूट मार्च करीत नागरिकांना पोलिसांनी सूचना केल्या. सदर रूट मार्च जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक डॉ . वैशाली कडुकर उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह दोन पोलीस अधिकारी भुईज पोलीस ठाणेकडील पोलिस अंमलदार तसेच सीआरपी जवानांसह आदींनी या रूट मार्चमध्ये सहभाग आपला नोंदवला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!