येळकोट येळकोट जय मल्हार, पाल यात्रा मोठ्या उत्साहांत संपन्न सातारा पोलिसांचा मोठा बंदोबस्त :- पोलीस अधीक्षक समीर शेख,


पुण्यभूमी उपसंपादक :संभाजी पुरीगोसावी

ADVERTISEMENT

उभ्या महाराष्ट्रांचे कुलदैवत असलेल्या पालीचा खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या विवाह सोहळा आज मोठ्या थाटात आणि येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात संपन्न झाला असून. या यात्रेसाठी महाराष्ट्र सह कर्नाटक आंध्र या भागातील लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कराड तालुक्यांतील पालीच्या खंडोबा देवाच्या यात्रेचा आज मुख्य दिवस श्री. खंडोबा व म्हाळसाकांत विवाह सोहळा गोरज मुहूर्तावर शनिवारी मोठ्या उत्साहांत पार पडला, येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट, च्या जयघोषाने पालीनगरी दुमदुमून गेली होती, या विवाह सोहळा पार पाडण्यासाठी लाखों भाविक सहभागी झाले होते, याच पार्श्वभूमीवर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पेशल कमोंडा पथक तैनात होते, याशिवाय आपत्कालीन दक्षता म्हणून जिल्हा प्रशासनाचे आपत्कालीन पथके, अग्निशामक दलाची पथके, आरोग्यविभाग पथके, रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली होती, तर आपत्कालीन उपयोगासाठी पाल-वडगांव इंदोली मार्गे पूर्णता: मार्ग मोकळा ठेवला होता, पाली यात्रेमध्ये भाविकांची काळजी घेता यात्रे कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सातारा पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त करण्यात आला होता, यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.वैशाली कडुकर मॅडम उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.अमोल ठाकूर प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे तहसीलदार कल्पना ढवळे सहाय्य गटविकास अधिकारी प्रताप पाटील उंब्रज पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोर कर्मचारी तसेच पोलीस पाटील देवस्थान ट्रस्ट यात्रा कमिटी स्वयंसेवक यांनी यात्रेचे नीटनेटके नियोजन करून यात्रा सुरळीतपणे पार पाडली, पत्रकारांना देखील मंदिरात प्रवेश देण्यास अटकाव केला पास आणा अथवा सोडले जाणार नाही अशी ठाम भूमिका घेतली होती,


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!