खेड बु.आणि पाडळी ग्रामपंचायतीद्वारे उद्यानदुतांचे उत्साहात स्वागत…
दि १६,खंडाळा ( सातारा ): बाळू धायगुडे
खेड बु. आणि मौजे पाडळी ता. खंडाळा येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित उद्यानविद्या महाविद्यालय फलटणमधील चतुर्थ वर्षातील विद्यार्थी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दाखल झाले आहेत.
साधारण २० आठवडे चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची विविध प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना दाखवली जाणार आहेत.
मौजे पाडळी येथील, ग्रामपंचायत कार्यालयाला उद्यानदुतांनी भेट दिली. त्यावेळी सरपंच सुरेखा वाघमारे,माजी सरपंच हरीभाऊ माने व इतर सदस्य, यांनी उद्यानदूतांचे स्वागत केले.तर खेड बु.येथे देखील सरपंच,उपसरपंच,सर्व सदस्य,ग्रामसेवक व खेड बु. ग्रामस्थ यांनी मोठ्या उत्सहात या उद्यानदुतांचे स्वागत केले.
उद्यान पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रात्यक्षिकांवर आधारित उपक्रम राबविला जातो.यात
उद्यानदुतांनी शेतकऱ्यांना शेती विषयक माहिती व नवीन तंत्रज्ञान याबाबत माहिती देऊन गावामध्ये शेती विषयी विविध उपक्रम राबवत मार्गदर्शन केले जाणार आहे.यात माती परीक्षण, फळबाग लागवड एकात्मिक कीड रोग, बीज प्रक्रिया व अत्याधुनिक यंत्राचा शेतीत वापर,जनावरांचे लसीकरण याविषयी शेतकऱ्यांशी संवाद साधुन मार्गदर्शन करणार असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले.
तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती आधारित उद्योग व्यवसाय याबाबत उद्यानदूत प्रथमेश चौधरी,हर्षल काळे, जतिन मांढरे,कल्लपा मुचंडी,प्रज्वल मुचंडी,पंचरत्न वाघमारे,गिरीराज कांबळे,गणेश जाधव,रोहित पवार, अभय तलवारे,योगेश लोदाडे,माधव मोरे हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.उद्यान दूतांनी आपले मनोगत व्यक्त करत दोन्ही गावच्या गावकऱ्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर,कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.यू.डी.चव्हाण व कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. जे. व्ही. लेंभे व प्रा. ए. डी. पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभणार आहे.


