लहुजी शक्ती सेना मोर्वे शाखा अध्यक्ष पदी सागर सपकाळ तर रतन आण्णा सपकाळ यांची तालुका संघटक पदी निवड
संपादक: दिलीप वाघमारे
लहुजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष मा.विष्णुभाऊ कसबे साहेब व प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे यांचे आदेशानुसार मा. बाळासाहेब जाधव जिल्हाध्यक्ष, लहुजी शक्ती सेना सातारा व सौ. अलका बोभाटे मॅडम जिल्हाध्यक्ष, महिला आघाडी,सदस्या, पंचायत समिती सातारा यांनी मा. कैलास भिसे तालुका अध्यक्ष खंडाळा यांचे शिफारसीनुसार सागर सपकाळ यांची मोर्वे शाखा अध्यक्ष पदी तर रतन आण्णा सपकाळ यांची तालुका संघटक म्हणून निवड करण्यात आली या निवडीचे नियुक्तीपत्र मा. अमोल चव्हाण उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, युवा नेते आशिष भाऊ कसबे सदस्य,राज्य कार्यकारिणी सौ. शोभा बाळासाहेब जाधव सदस्या, पंचायत समिती खंडाळा, मा. नितिन वायदंडे संपर्कप्रमुख महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी रामभाऊ पाटोळे संपर्कप्रमुख, सुनिल भिसे उपाध्यक्ष, विजया खरात उपाध्यक्ष महिला आघाडी,मोहन खुडे तालुका अध्यक्ष जावली, महेंद्र खरात तालुका अध्यक्ष कोरेगाव सौ सुनिता वायदंडे अध्यक्ष महिला आघाडी खटाव उपस्थित होते. यावेळी मोर्वे शाखेची कार्यकारणी मध्ये
अध्यक्ष – सागर सपकाळ
कार्याध्यक्ष -किरण सपकाळ
उपाध्याक्ष – किशोर सपकाळ
सचिव – सनी सपकाळ
संपर्कप्रमुख – अमोल सपकाळ
संघटक – रोहित सपकाळ
खजिनदार – हनुमंत सपकाळ
सहसंघटक – विवेक सपकाळ
या निवडी करण्यात आल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले गेले.


