वैष्णवी हगवणे प्रकरणात जालिंदर सुपेकरांना आणखीन एक दणका; पुण्यातून तडकाफडकी बदली.


संभाजी पुरीगोसावी

पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणात नाव आल्याने पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी वाढत आहेत. वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपेकर यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांच्याकडून तीन कारागृहांचा उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कारभार काढून घेण्यात आला होता. यानंतर आता त्यांची विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, पुणे या पदावरून उपमहासमादेशक होमगार्ड, मुंबई या ठिकाणी बदली करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राजेंद्र हगवणे यांचे मेहुणे जालिंदर सुपेकर आहेत. सुपेकरांचा दबाव पोलिसांवर असल्याने हगवणे यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप सातत्याने होत आहे. आता जालिंदर सुपेकरांना मोठा दणका देण्यात आला असून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. जालिंदर सुपेकर यांची विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, पुणे या पदावरून उपमहासमादेशक होमगार्ड, मुंबई या ठिकाणी बदली करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

जालिंदर सुपेकर यांची नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर कारागृहांची अतिरिक्त जबाबदारी काढून घेण्यात आली होती. सध्या जालिंदर सुपेकर यांच्यावर विविध आरोप होताना दिसत आहेत. त्यानंतर आता त्यांची बदली करत त्यांना मोठा दणका दिला आहे.

दरम्यान हगवणे बंधूंचे शस्त्र परवाने मंजूर करण्याबाबतही सुपेकर यांच्यावर आरोप होत आहेत, ज्यावर अगोदरच सुपेकरांनी स्पष्टीकरण दिले आहे. शस्त्र परवाना देण्याचे अधिकार संबंधित पोलीस आयुक्तांना असतात, असेही सुपेकरांनी त्यांच्या स्पष्टीकरणात म्हटले होते.

 

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!