महाराष्ट्र ज्ञान महामंडळातर्फे आयटी प्रोफेशनल लॅबचा सन्मान.
सातारा: धर्मेंद्र वर्पे
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ तर्फे आयटी प्रोफेशनल लॅबचा “सन्मान” खंडाळा येथील महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे अधिकृत संगणक प्रशिक्षण केंद्र “आयटी प्रोफेशनल लॅब ” या संस्थेचे संस्थापक संचालक सागर भोसले यांचा शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र ज्ञान महामंडळातर्फे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल )जिल्हा मुख्य कार्यालयामार्फत कराड येथील हॉटेल VITS सत्यजित येथे आयोजित दिमाखदार सन्मान सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमास महाराष्ट्र ज्ञान महामंडळा चे वरिष्ठ व्यवसाय व्यवस्थापक कौशल ओहोळ, विभागीय व्यवस्थापक दीपक कुंभार,उपविभागीय व्यवस्थापक अनिल गावंडे,जिल्हा समन्वयक विक्रम जाधव, जिल्हा उप समन्वयक पराग पालवे,अमोल पाटील तसेच सुहास साठे आणि सातारा जिल्हा अधिकृत संगणक प्रशिक्षण केंद्र संचालक,प्रशिक्षक उपस्थित होते.
वीस वर्षापासून महाराष्ट्रातील शहरांसोबतच गावोगावी घराघरांमध्ये संगणक ज्ञान पोहोचवणारे व महाराष्ट्र डिजिटल साक्षर करण्यामध्ये महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचा उल्लेखनीय हातभार आहे.
आयटी प्रोफेशनल लॅब या संस्थेतर्फे खंडाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे संगणक प्रशिक्षण देत असतानाच इतर हि उपक्रमात सहभाग नोंदवत असते जसे की हिरोजी इंदलकर किल्ले संवर्धन कार्यक्रम,विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेली वीर बाजी पासलकर शिकता शिकता कमवा योजना. महाराष्ट्र शासन अंतर्गत सारथी व एमकेसीएल तर्फे मराठा विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मोफत प्रशिक्षण कार्यक्रम उपक्रमामध्ये संस्थेचा व विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय सहभाग असतो.
सागर भोसले व त्यांच्या संस्थेतील सहकारी हे अविरतपणे खंडाळा व पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन करत असतात.आयटी प्रोफेशनल लॅब मधील विद्यार्थ्यांचा जून महिन्यातील शिकता शिकता कमवा हा उपक्रम देखील उल्लेखणीय होता.अशा संस्थेचा सन्मान होणे हे कौतुकास्पद आहे. राजेंद्र भोसले, मा.उपसरपंच,शिवाजीनगर


