रोटरी क्लब लोणंद तर्फे रुग्णउपयोगी वस्तूंचे मदत केंद्र
उपसंपादक: दिलीप वाघमारे
रोटरी क्लब लोणंद तर्फे रुग्णउपयोगी वस्तूंचे मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. यामध्ये ऍडजेस्टेबल बेड, व्हीलचेयर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन मशीन, वाकर इ इत्यादी वस्तूंचा संच करण्यात आला आहे. ज्या पेशंटला गरज आहे त्या पेशंटनी रोटरी क्लब लोणंद संपर्क साधून विना मोबदला घेऊन जाव्यात.
ADVERTISEMENT
तसेच ज्या दानशूर व्यक्तींना अशा वस्तू डोनेशन अथवा कोणाच्या स्मरणार्थ म्हणून द्यायचे आहेत त्यांनी रोटरी क्लब लोणंदला द्याव्यात जेणेकरून रुग्णांचा जास्त फायदा होईल असे आव्हान रोटरी क्लब लोणंद चे अध्यक्ष रो. प्रवीण चांदवडकर सचिव रो गोपाल खंडारे यांनी केले आहे. प्रोजेक्टच्या अधिक माहितीसाठी व वस्तू देणे व घेणे याकरता रो प्राजित परदेशी यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान रोटरी क्लब लोणंद तर्फे करण्यात येत आहे.


