बदलापूरच्या घटनेनंतर जि.प.सारोळा शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अश्रू झाले अनावर..
सारोळे : बदलापूरच्या घटना खरच खूपच दुर्दैवी होती . या घटनेनंतर सारोळे शाळेमध्येही मुला-मुलींशी मुक्त संवाद करण्यात आला यामध्ये मुलांना या घटने विषयी काय वाटते ते जाणून घेतले.बऱ्याच मुलांना घटनेची सविस्तर माहिती होती .बदलापूरच्या घटनेमुळे विराज प्रविण धाडवे इयत्ता सातवी हा मुलगा खूप जास्त अस्वस्थ झाला. स्वतःचे मत व्यक्त करताना त्याला अश्रू थांबवता आले नाहीत आणि त्याबरोबर इतरही अनेक मुलं मुली आणि शाळेतील शिक्षकांनीही अश्रूंना मार्ग मोकळा केला.साडेतीन वर्षाच्या मुलीवर जेव्हा अत्याचार होतो तेव्हा आपण सर्व तरुण मुलांनी काय करणे आवश्यक आहे मुलींसाठी आपण कसं खंबीर राहून त्यांना मदत केली पाहिजे हे मात्र छोटासा विराज सांगायला विसरला नाही .
सौ वंदना कोरडे यांनी “गुड टच बॅड टच” विषयी तसेच असे प्रसंग घडूच नये यासाठी काय करावे याविषयी मार्गदर्शन केले.इयत्ता तिसरीतील चिमुरड्या स्वरांजली सणस आणि आरोही बोरगे या मुलींनी “गुड टच बॅड टच” विषयी प्रात्यक्षिक सादर केले . सौ कांचन थोपटे, जया कांचन , अर्चना वानखडे यांनीही मुलांना सतत कसे जागरूक आणि सज्जक राहणं आवश्यक आहे कोणती खबरदारी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. मुख्या. विजयकुमार थोपटे,संदीप सावंत,छाया हिंगे,जयश्री शिर्के हे देखील या कार्यक्रमास उपस्थित होते.
या संवादामुळे शाळेतील अनेक मुलींना आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्यांनीही स्वतःला आलेल्या वाईट अनुभवांची मालिकाच आपल्या शिक्षिकांसमवेत बोलून दाखवली . परिसरामध्ये नक्कीच अशा घटना घडत आहेत आणि त्यासाठी पालकांनी तसेच गावांनी आणि शाळेने सर्वांनी मिळून एकत्रित काम केले तर अशा घटनांनचे प्रमाणात काही प्रमाणात तरी होईल.
शाळेत जेव्हा मुले अशा घटनांविषयी अस्वस्थ होऊन व्यक्त होतात तेव्हा मात्र आपल्या मोठ्यांवर मात्र नक्कीच खूपच मोठी जबाबदारी येऊन पडते.
पालकांनी दररोज मुलांना आजचा दिवस कसा होता. तू नेमकं काय केलं? कोण भेटलं? यासारख्या प्रश्नांनी त्यांचा दिनक्रम जाणून घ्या. कारण मुलांना असे प्रश्न विचारल्यावर ते मोकळे होतात. आणि नेमकं काय काय घडलं हे सांगत जातात.मुलांना आपलं मत मोकळेपणाने मांडायला शिकवा. तसेच एखादी चुकीची गोष्ट घडत असेल तर त्या विरोधातही बोलायला शिकवा. कुणावरही विश्वास ठेवताना त्या व्यक्तीला समजून घेणे तितकेच महत्त्वाचं असल्याचं मुलांना शिकवा.
मुख्या. केंद्रप्रमुख विजयकुमार थोपटे
मुलांना त्यांच्या त्यांच्या वयानुसार “गुड टच आणि बॅड टच ” हा कार्यक्रम आज शाळेमध्ये घेतला ही खूप चांगली गोष्ट आहे. या उपक्रमाने समाजात अशा घडणाऱ्या घटनांना आळा बसेल.”चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श ” याबद्दल सविस्तरपणे माहिती मिळाल्याने मुलींमध्ये जागरूकता निर्माण होईल.
मा.अध्यक्ष शालेय समिती सारोळे योगेश धाडवे


