पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन ; सुप्रिया सुळे यांची आंदोलनाला भेट.
मुख्य संपादक: मंगेश पवार
कार्यकारी संपादक :सागर खुडे
पुण्यात स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलन मंगळवार (२०ऑगस्ट) पासून चालू आहे. रविवार दि. २५ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी दोन परीक्षा आल्याने दोन परीक्षा देणे शक्य नाही. राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि आयबीपीएस ची परीक्षा एका दिवशी आली आहे.
त्यामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा काही दिवसांनी पुढे ढकलावे अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. एमपीएससीची परीक्षा ठरलेल्या वेळेस होणार असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कळवण्यात आले होते..
स्पर्धा परीक्षा विदयार्थी आंदोलनाला खासदार सुप्रिया सुळे यांचा बुधवार (दि.२१ऑगस्ट)रोजी सक्रिय सहभाग तसेच पुणे नगरीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप,युवती जिल्हाध्यक्ष दुर्गा चोरघे सहित उपस्थिती दर्शवली होती.
पुण्यात गेले 2 दिवस स्पर्धा परीक्षा करणारे विध्यार्थी आंदोलन करत आहेत. एका दिवशी दोन पेपर ठेऊन विद्यार्थ्यांच नुकसान होत आहे मागणी अजूनही मान्य केली नाही. कम्बाईन ग्रुप बी आणि सी ज्या १५००० जागा याची जाहिरात आली पाहिजे.२५ तारखेची परीक्षा पुढे घेतली पाहिजे या परीक्षेत घातलेला घोळ पारदर्शकपणे ऑन मेरिट हा झाला पाहिजे तसेच रिझल्टही वेळेवर लागला पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी पुण्यात बोलताना सांगितलं.


