ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर! युवक अध्यक्ष महेश टापरे, युवती अध्यक्ष दुर्गा, चोरघे


कार्यकारी संपादक : सागर खुडे

भोर राजगड (वेल्हा) मुळशीचे कार्यसम्राट आमदार मा.श्री.संग्राम थोपटे व अंनत निर्मल चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष सौ.स्वरूपा थोपटे यांच्या सौजन्याने युवा नेते मा.पृथ्वीराज थोपटे उपाध्यक्ष अंनतनिर्मल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातूम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सरस्वती महाविद्यालय आंबवणे, ता.राजगड येथे पार पडलेल्या या मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांनी मोठी उपस्थिती दर्शवली.

ADVERTISEMENT

 

‘शोध स्वतःचा’ या विषयावर ॲड.अनिषा फनसळकर यांनी सविस्तरपणे मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनाचा गुरुमंत्र दिला.

प्रसंगी प्रमुख उपस्थिती पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश टापरे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष युवती अध्यक्षा ॲड.कु.दुर्गा चोरघे,

भोर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल पडवळ, राजगड (वेल्हा ) तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज शेंडकर, सरस्वती महाविद्यालय अध्यक्ष माऊली आप्पा तळेकर, यांच्यासह विशाल वालगुडे, महाविद्यालयाचे प्राचार्य बेंद्रे सर, विद्यार्थी, पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!