विजेची तार कोसळून महिला बचावली!शेळीचा जागीच मृत्यू.


 

सातारा प्रतिनिधी : शंकर माने

ADVERTISEMENT

सोमवार दि. 20 मे पाटण चाफळ विभागातील धायटी कांबळवाडी येथील वीज वाहक तार तुटून शेळीच्या अंगावर पडल्याने शेळी जागीच ठार झाली शेळी राखण्यासाठी गेलेली महिला यावेळी सुदैवाने थोडक्यात बचावली या घटनेची माहिती मिळतात चाफळ येथील लाईनमन अभिजीत अशोक साळुंखे यांनी संबंधित ठिकाणी जाऊन वीजपुरवठा तात्काळ बंद केल्याने पुढील अनर्थ टळला कांबळवाडी येथील यशवंत भागोजी पेंढारे यांच्या घरातील महिला शेतात शेळ्या चारण्यासाठी घेऊन गेले होत्या शेळ्यात चरत असताना अचानक चालू विद्युत तार तुटून एका शेळीच्या अंगावर पडल्याने शेळीचा होरपळून जागेवरच मृत्यू झाला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!