त्या नराधमांना फासावर लाटवा अन्यथा आमच्या ताब्यात द्या! रिपाई दादासाहेब ओव्हाळ.
उपसंपादक : दिलीप वाघमारे
कोलकत्ता येथे झालेल्या एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर युवती वरती जो अन्याय अत्याचार झाला तो नराधम संजय राय यास फासावर लटकावावे आणि हे प्रकरण ताज्या असतानाच मुंबई बदलापूर येथील साडेतीन वर्षाच्या चिमूरड्या दोन मुलींवरती अक्षय शिंदे या निच नराधमाने अमानुष रित्या त्यांचे लैंगिक छळ करून त्यांच्यावरती अतिप्रसंग केला ही घटना बदलापूर येथील एका नामांकित शाळेमध्ये घडलेली आहे या घटनेचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करीत आहोत दहिवडी जि सातारा येथील शिखरशिगंनापूर डोंगरामध्ये आपल्या अल्पवयीन मुली वरती बलात्कार करणाऱ्या नराधम बापास सुद्धा फसवला करण्यात यावे येणाऱ्या काळामध्ये या अशा महिला अबला व लहान मुलींवरती अन्य अत्याचार करणाऱ्या नराधमांना तात्काळ फासावर लाटकावा अन्यथा प्रशासनाने आम्हाला म्हणजेच रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्त्यांना थोडीशी सवलत द्यावी मग अशा नराधमाचा बंदोबस्त आम्ही करू आणि त्यांना भर चौकात पेटवून देऊ … असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी दिला एकंदरच संपूर्ण भारतामध्ये अल्पसंख्याक तसेच महिला व लहान मुली सुद्धा असुरक्षित आहेत त्यामुळे अशा घटना या फक्त आणि फक्त काही जणांच्या पाठबळावरती घडत आहेत त्यामुळे पाठबळ देणार ना पण दोषी ठरवून त्यांना सुद्धा कायमस्वरूपी जेरबंद केले पाहिजे तसेच गुन्हा करणाऱ्यांना खटला तात्काळ फास्ट ट्रॅक वरती चालवून फासावर लटकवले पाहिजे यासाठी येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा भर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल होणाऱ्या सर्व स्वीकारण्याची जबाबदारी शासन प्रशासनाची राहील..


