माण तालुका लहुजी शक्ती सेनेच्या तालुका अध्यक्ष पदी युवा नेते दिपक खवळे यांची निवड! माण तालुक्यात लहुजी शक्ती सेनेचा झंझावात उभा करणार – जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव
उपसंपादक : दिलीप वाघमारे
आज माण तालुका लहुजी शक्ती सेनेच्या तालुका अध्यक्ष पदी युवा नेते दिपक खवळे यांची निवड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी केली या प्रसंगी बोलताना जाधव साहेब यांनी सांगितले की माण तालुक्यात लहुजी शक्ती सेनेचा झंझावात उभा करणार संस्थापक अध्यक्ष मा. विष्णुभाऊ कसबे साहेब यांनी समाजासाठी जो विविध प्रश्नासाठी लढा दिला आहे आणि समाजाचे विविध प्रश्न मार्गी लागले आहेत त्या नेतृत्वाच्या पाठीशी माण तालुक्यातील कार्यकर्त्यांनी भक्कम पणे राहून संघटनेची ताकत वाढवावी यावेळी तालुका संपर्कप्रमुख शहाजी खवळे खंडाळा तालुका खजिनदार शामराव खिलारे पाडळी शाखा अध्यक्ष विलास बाबर संदिप आवळे उपाध्यक्ष युवक आघाडी यांना नियुक्ती पत्र देण्यात आली याप्रसंगी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव व संपर्कप्रमुख रामभाऊ पाटोळे यांनी फलटण बार असोसिएशन खजिनदार व सहखजिनदार पदी निवड झालेबद्दल ऍड प्रशांत साठे व ऍड मोहिते यांचा सत्कार केला तर कैलास भिसे तालुका अध्यक्ष खंडाळा व कुमार रिठे, गोविंद मोरे (पत्रकार) शरद रिटे यांनी नविन पदाधिकारी यांचा सत्कार केला यावेळी तिन्ही तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते


